Sunil Shelke on BJP : मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी भाजपमधील गटबाजीवर जोरदार तोफ डागली आहे. भाजपमध्ये सध्या जुन्या-नव्यांची सरमिसळ नसून, तीन गट कार्यरत असल्याचे मत सुनिल शेळके यांनी व्यक्त केले आहे. यामुळं आता मावळमधील राजकीय वातावरण तापल्याचं चिन्ह पाहायला मिळत आहे.
Sunil Shelke : नेमकं काय म्हणाले आमदार सुनील शेळके?
भाजपमध्ये थेट तीन गट कार्यरत असल्याचे मत आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केले आहे. एक गट माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, दुसरा रवींद्र भेगडेंचा आणि तिसरा दलाल व लाभार्थ्यांचा नवीन गट असल्याचा थेट निशाणा सुनिल शेळकेंनी साधला. शेळकेंनी भाजपच्या कार्यपद्धतीची खिल्ली उडवली. मुख्यमंत्र्यांसोबत फक्त फोटो काढायचे आणि काही नाही मिळालं की आंदोलन करायचं', असा टोला लगावत आमदार शेळके यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं आहे. त्यामुळे मावळच्या राजकारणात सुनील शेळके यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शेळकेंच्या या सडकून टीकेला आता स्थानिक भाजप नेते काय प्रत्युत्तर देतात, याकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे.
भाजपच्या गटा तटावर आपलं राजकारण नाही
दरम्यान, भाजपच्या गटा तटावर आपलं राजकारण आलं नाही. जे केलं ते भोगावं लागतं असल्याची टीका सुनिल शेळके यांनी केली. आंदोलन अजितदादांच्या विरोधात झाले. तेच भाजपच्या विरोधात आंदोलन झालं ते भाजपच्याच लोाकांनी केल्याचे सुनिल शेळके म्हणाले. तीन गट वेगळे काम करतात. एक बाळा भाऊंचा गट मुख्यमंत्र्यांकडे जातो फोटो काढतो, दुसरा जातो परत फोटो काढतो, तिसरा जातो फोटो काढतो आणि काही नाही मिळालं की आंदोलन करतो अशी टीका शेळकेंनी केली. ही नवीन पद्धत आल्याचे शेळके यावेळी म्हणाले.
भाजपचे स्थानिक नेते काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी भाजपची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले आहे. मावळमध्ये भाजपचे तीन गट असल्याचे शेळके म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळं माळ तालुक्यातील राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आता सुनिल शेळके यांनी केलेल्या टीकेल्या भाजपचे स्थानिक नेते काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.