एक्स्प्लोर

Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...

Baramati byelection Sunetra Pawar Rally: बारामतीमध्ये आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीची सांगता सभा होणार आहे. या सभेला देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील.

Baramati byelection Sunetra Pawar Rally: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  निधनानंतर बारामतीत होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासह पवार कुटुंबीयांनी बारामती (Baramati bypoll 2026) पिंजून काढल्यानंतर मंगळवारी याठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडणार आहे.  सभेसाठी मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) हेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, सभास्थळी दादांच्या आठवणींना उजाळा देणारे काही भावनिक फोटो लावण्यात आले आहेत. हे फोटो बारामतीकरांच्या भावना जागृत करणारे ठरत असून अनेकांना जुन्या आठवणींमध्ये घेऊन जात आहेत. या माध्यमातून दादांच्या कार्याची आणि त्यांच्या सहवासाची आठवण उपस्थितांना करून दिली जात आहे. (Maharashtra Politics news)

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मंगळवारी सकाळी सभास्थळी येऊन सर्व गोष्टींची पाहणी केली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना म्हटले की, आजच्या सभेला मुख्यमंत्री साहेब, उदय सामंत, रामदास आठवले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते येणार आहेत. दादांच्या आठवणी बारामतीच्या कणाकणात आहेत, तुम्हाला लोकांच्या भावनांतून त्या कळतील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले. आजच्या सभेला सुप्रियाताई येणार आहेत. याशिवाय पवार कुटुंबातील अनेकजणही येतील. पवार साहेबांची प्रकृती बरी नाही, त्यामुळे अजून त्यांचा मला काही निरोप आलेला नाही. पण सुप्रिया ताई नक्की येतील, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली. 

अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी येत असताना त्यांचे विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना कोसळले होते. यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बारामतीत पोटनिवडणूक होत असून सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आकाश मोरे यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या शिष्टाईनंतर काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली होती. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरला नव्हता. तरीही सुनेत्रा पवार यांच्याविरोधात 22 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 

Parth Pawar: सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणायचं आहे: पार्थ पवार

बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी त्या किती मताधिक्याने निवडून येणार, ही बाब महत्त्वाची ठरणार आहे. बारामतीच्या आजपर्यंतच्या इतिहासात अजित पवार हे कायम मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी फक्त जिंकून चालणार नाही, तर त्यांना मोठे मताधिक्यही मिळणे गरजेचे आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी सांगितले की, मला एवढाच मेसेज द्यायचा आहे की, सुनेत्रा वहिनी निवडून येणार आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मग अनेक लोक म्हणतील वहिनी निवडून येणार आहेत, मग मतदान करायला कशाला यायचे. पण आपल्याला एक रेकॉर्ड तोडायचा आहे. दोन लाख 17 हजाराचा रेकॉर्ड तोडायचा आहे. त्यामुळे मी विनंती करतो की, मतदान करायला बाहेर पडा, असे आवाहन पार्थ पवार यांनी बारामतीच्या मतदारांना केले होते.

आणखी वाचा

अजितदादांच्या तपासाला दिरंगाई का? मुख्यमंत्र्यांनाच विचारलं पाहिजे, अमोल मिटकरींचा सरकारला घराचा आहेर, तर रोहित पवारांचा थेट इशारा, म्हणाले 10 मेपर्यंत....

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आनंद परांजपेंच्या गळ्यात भगवा; राष्ट्रवादीतील राजीनाम्यानंतर शिवसेनेत प्रवेश; म्हणाले, 12 वर्षांचा वनवास संपला
आनंद परांजपेंच्या गळ्यात भगवा; राष्ट्रवादीतील राजीनाम्यानंतर शिवसेनेत प्रवेश; म्हणाले, 12 वर्षांचा वनवास संपला
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
'NEET' पेपरफुटीवर संतापले राज ठाकरे; विजय थलपतींचं नाव घेतलं, उत्तर-दक्षिण गणितंही मांडलं, नेमकं काय म्हणाले?
'NEET' पेपरफुटीवर संतापले राज ठाकरे; विजय थलपतींचं नाव घेतलं, उत्तर-दक्षिण गणितंही मांडलं, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report
Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Sunetra Pawar : पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
Embed widget