Sunetra Pawar Oath Of Deputy Chief Minister: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. (Maharashtra First Women DCM Of Maharashtra)

सदर शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं आहे. दरम्यान आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Oath Of Deputy Chief Minister) बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. यामुळे रिक्त होणाऱ्या जागी पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. (Ajit Pawar Wife Sunetra Pawar)

सुनेत्रा पवारांचा परिचय- (Who Is Sunetra Pawar)

  1. वय 62 वर्षे, धाराशिवच्या तेरमध्ये 1963 ला जन्म
  2. वडील बाजीराव पाटील त्यावेळचे मोठे स्थानिक नेते
  3. माजी मंत्री, माजी खासदार पद्मसिंह पाटील हे सख्खे भाऊ
  4. 1983 ला संभाजीनगरच्या सरस्वती भुवन कॉलेजमधून कॉमर्सच्या पदवीधर
  5. 1985 ला भाऊ पद्मसिंह पाटलांच्या पुढाकाराने अजित पवारांशी विवाहबद्ध
  6. लग्नानंतरही सक्रीय राजकारणापासून दूरच
  7. काटेवाडीत सार्वजनिक शौचालये बांधण्यातील पुढाकार हे पहिले सामाजिक काम
  8. 2006 ला काटेवाडीचा निर्मल ग्राम पुरस्काराने गौरव, हागंदारीमुक्त गाव म्हणून जाहीर
  9. 2008-'बारामती हाय टेक टेक्स्टाईल पार्क'ची उभारणी आणि अध्यक्ष 
  10. 2010 ला 'एनवायरनमेंटल फोरम ऑफ इंडिया'ची स्थापना
  11. सुनेत्रा पवार विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांपैकी एक
  12. 2011 पासून फ्रान्सच्या 'वर्ल्ड एंटरप्रेन्युअरशीप फोरम'या थिंक टँकच्या सदस्या
  13. 2017 पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य
  14. राष्ट्रवादी फुटल्यानंतर राजकीय कार्यक्रमात सहभाग सुरु
  15. 2024 च्या लोकसभा निवडणुकीद्वारे प्रथमच सक्रीय राजकारणात
  16. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंकडून पराभूत
  17. 18 जून 2024 ला राज्यसभेच्या सदस्यपदी
  18. आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

राष्ट्रवादी पक्षाच्या निर्णयांना आमचा पाठिंबा- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Sunetra Pawar)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचा कोणताही निर्णय हा राष्ट्रवादी पक्षच घेईल. राष्ट्रवादी पक्षाच्या त्या निर्णयांना आमचा पाठिंबा असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्यासोबत दोनवेळा चर्चा केली आहे. पण कोणत्याही मुद्द्यावरचा अंतिम निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

संबंधित बातमी:

Sunetra Pawar : राष्ट्रवादीचं ठरलं! सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार, आज शपथविधी पार पडणार, अर्थखात्यासाठी मोठी रस्सीखेच