Sunetra Pawar and Narhari Zirwal: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या झिरवळ यांच्या कारभारावर प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपीक राजेंद्र ढेरिंग याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) 35 हजारांची लाच घेताना पकडले होते. या घटनेमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. साहजिक या सगळ्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) प्रचंड बदनामी झाली होती. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. यावेळी सुनेत्रा पवार यांनी झिरवळ यांच्यासमोर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.  स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही, याची काळजी घ्या. तसेच प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाही, याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवळ यांना केल्याचे सांगितले जाते. अन्न आणि औषध खात्याच्या कर्मचाऱ्याला एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर वेगाने कारवाई सुरु झाली होती. त्यानंतर नरहरी झिरवळ अज्ञातवासात गेले होते. त्यांचा फोन स्वीच ऑफ असल्याने ते जवळपास नॉट रिचेबल होते. मात्र, याप्रकरणाची प्रचंड चर्च व्हायला लागल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोमवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुकाणू समितीची (Core Committee) तातडीची बैठक बोलावली होती. त्यानुसार काल देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडली. तत्पूर्वी याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचीही एक बैठक झाली. त्यानंतर कोअर कमिटीमधील वरिष्ठ नेत्यांची एक वेगळी बैठक पार पडली. त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवळ यांना स्पष्ट शब्दात समज दिल्याचे सांगितले जाते. दरम्यान, नरहरी झिरवळ हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊ शकतात. त्यांच्यासमोर ते आपली बाजू मांडतील, अशी शक्यता आहे.

Continues below advertisement

Narhari Zirwal latest news: या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत पोहोचले तर मी राजीनामा देईन: नरहरी झिरवळ

"माझ्या विभागातील क्लार्क लाच प्रकरणात सापडला ही माझीही जबाबदारी आहेच, ही जबाबदारी नाही म्हणून चालणार नाही. त्याने जे कृत्य केलंय, त्या कृत्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि चौकशीत जर या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत आले तर मी मंत्रि‍पदाचा राजीनामा देईन," अशी प्रतिक्रिया लाचखोरीचे प्रकरण उघड झाल्यानंतर नरहरी झिरवळ यांनी दिली होती.

Continues below advertisement

आणखी वाचा

नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले