एक्स्प्लोर

Sunetra Pawar and Narhari Zirwal: मोठी बातमी: सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांवर नाराजी, देवगिरी बंगल्यावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत स्पष्टच म्हणाल्या...

Sunetra Pawar and Narhari Zirwal: अन्न आणि औषध प्रशासन खात्याच्या मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात एसीबीने राजेंद्र ढेरिंगे या कर्मचाऱ्याला 35 हजारांची लाच घेताना पकडले होते.

Sunetra Pawar and Narhari Zirwal: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या झिरवळ यांच्या कारभारावर प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपीक राजेंद्र ढेरिंग याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) 35 हजारांची लाच घेताना पकडले होते. या घटनेमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. साहजिक या सगळ्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) प्रचंड बदनामी झाली होती. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. यावेळी सुनेत्रा पवार यांनी झिरवळ यांच्यासमोर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. 

स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही, याची काळजी घ्या. तसेच प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाही, याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवळ यांना केल्याचे सांगितले जाते. अन्न आणि औषध खात्याच्या कर्मचाऱ्याला एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर वेगाने कारवाई सुरु झाली होती. त्यानंतर नरहरी झिरवळ अज्ञातवासात गेले होते. त्यांचा फोन स्वीच ऑफ असल्याने ते जवळपास नॉट रिचेबल होते. मात्र, याप्रकरणाची प्रचंड चर्च व्हायला लागल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोमवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुकाणू समितीची (Core Committee) तातडीची बैठक बोलावली होती. त्यानुसार काल देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडली. तत्पूर्वी याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचीही एक बैठक झाली. त्यानंतर कोअर कमिटीमधील वरिष्ठ नेत्यांची एक वेगळी बैठक पार पडली. त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवळ यांना स्पष्ट शब्दात समज दिल्याचे सांगितले जाते. दरम्यान, नरहरी झिरवळ हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊ शकतात. त्यांच्यासमोर ते आपली बाजू मांडतील, अशी शक्यता आहे.

Narhari Zirwal latest news: या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत पोहोचले तर मी राजीनामा देईन: नरहरी झिरवळ

"माझ्या विभागातील क्लार्क लाच प्रकरणात सापडला ही माझीही जबाबदारी आहेच, ही जबाबदारी नाही म्हणून चालणार नाही. त्याने जे कृत्य केलंय, त्या कृत्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि चौकशीत जर या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत आले तर मी मंत्रि‍पदाचा राजीनामा देईन," अशी प्रतिक्रिया लाचखोरीचे प्रकरण उघड झाल्यानंतर नरहरी झिरवळ यांनी दिली होती.


आणखी वाचा

नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
Maharashtra Budget 2026: रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
Uddhav Thackeray And Eknath Shinde Vidhabhavan Video: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?
ठाकरे आणि शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?, VIDEO
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget