Sunetra Pawar And Sharad Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. (Maharashtra First Women DCM Of Maharashtra)

आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी (Sunetra Pawar Oath) होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. मात्र या शपथविधी सोहळ्यापासुन शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुर ठेवण्यात आल्याचं चित्र आहे. अजित पवारांच्या निधनाआधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन्ही पक्ष आघाडी करून लढवत होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा देखील होत होती. (Sunetra Pawar And Sharad Pawar)

पवार कुटुंबात नाराजी, सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची भेट नाही- (Ajit Pawar NCP And Sharad Pawar NCP)

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ या नेत्यांनी शरद पवारांच्या पक्षासोबत या शपथविधी सोहळ्याबद्दल कोणतीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात आणि एकुणच पवार कुटुंबात नाराजी असल्याचं बोलल्याच दिसून येतंय. काल बारामतीत अजित पवारांच्या रक्षा विसर्जनाचा विधी पार पडला. या विधीसाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र होत्या. त्यानंतर दोघी वेगवेगळ्या दिशेने गेल्या. त्यानंतर राजकीय घडामोडींना मुंबईत वेग आला आणि सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री बनणार यावर शिक्कामोर्तब झाले. यादरम्यान सुनेत्रा पवार यांची शरद पवारांसोबत भेट झालेली नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी संवाद न साधल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चाला खोडा लागल्याचं बोललं जात आहे. 

शपथविधीपूर्वी विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक- (NCP Sunetra Pawar)

सदर शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं आहे. दरम्यान आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Oath Of Deputy Chief Minister) बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. 

संबंधित बातमी:

Sunetra Pawar Oath Of Deputy Chief Minister: सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार; पार्थ पवार राज्यसभेवर?, दिवसभरात काय काय घडलं?