एक्स्प्लोर

Sunetra Pawar Meet Naredra Modi And Amit Shah In Delhi: देवेंद्र फडणवीसांचा काल रात्री अचानक दिल्ली दौरा, पहाटे मुंबईत पोहोचले; आज सुनेत्रा पवारही दिल्ली गाठणार, नेमकं काय काय घडतंय?

Sunetra Pawar Meet Narendra Modi And Amit Shah In Delhi: देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

Sunetra Pawar Meet Narendra Modi And Amit Shah In Delhi: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (09 फेब्रुवारी) रात्री अचानक दिल्ली गाठल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची रात्री भेट घेतली. त्यानंतर आज पहाटेच देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल झाले. राज्यातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व आलंय. पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचे वेध लागू लागले आहेत. विलिनीकरणाबाबत राज्यातल्या मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे. 

राज्यात पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गोपनीय दिल्ली दौराही त्याच अनुषंगाने असल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत. आज सायंकाळी 6.45 सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना होतील. 

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारही दिल्लीत जाणार- (Sunetra Pawar Delhi)

सुनेत्रा पवार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेटीसाठी जात असल्याची उपमुख्यमंत्री कार्यालयाची माहिती आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीचा गुप्त दौरा केल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आलं आहे. दिल्ली दौऱ्यामधे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल देखील सोबत असणार आहेत. 

जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर- (Ajit Pawar NCP ZP Election 2026)

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट दुसऱ्या स्थानी राहिला आहे. यापूर्वी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीतही विक्रमी जागा जिंकत भाजपने यशाचे शिखर गाठले होते. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. जिल्हा परिषदेत 731 जागांपैकी भाजपचे सर्वाधिक 233 सदस्य निवडून आले आहेत. त्याखालोखाल अजित पवार गट 167 आणि शिंदेसेना 162 जागा जिंकल्या आहेत. महायुतीने 731 पैकी तब्बल 562 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेस 56, शरद पवार गट 26 आणि उद्धवसेना 43 अशा महाविकास आघाडीने अवघ्या 125 जागा जिंकल्या आहेत. 

संबंधित बातमी:

Amit Shah Post Maharashtra ZP Election Result 2026: अमित शाहांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं नाव घेणं टाळलं; भाजप आणि शिवसेनेचाच उल्लेख, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2026: ज्येष्ठ नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते पण ऐनवेळी एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेत नाराजी
ज्येष्ठ नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते पण ऐनवेळी एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेत नाराजी
Yugendra Pawar: अजितदादांचं विमान पडलं तिकडे एकही मोठं झाड नाही, केवळ लहान झुडपं आहेत; युगेंद्र पवारांकडून डीजीसीएच्या रिपोर्टमधील चूक समोर आणली
अजितदादांचं विमान पडलं तिकडे एकही मोठं झाड नाही, केवळ लहान झुडपं आहेत; युगेंद्र पवारांकडून डीजीसीएच्या रिपोर्टमधील चूक समोर आणली
Ritu Tawde: मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र; भूपेंद्रभाई पटेलांकडे केली मोठी मागणी
मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र; भूपेंद्रभाई पटेलांकडे केली मोठी मागणी
BJP Working Committee: राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपकडून कार्यकारिणीची घोषणा, उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी
भाजपकडून मुंबई प्रदेश कार्यकारिणीची घोषणा, उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
Rajya Sabha Election 2026 Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला शिवसेनेकडून राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
अमेरिका इस्त्रायलच्या इराण हल्ल्याचे 100 तास; एक हजारांवर मृत्यूमुखी, 17 इराणी जहाजे बुडाली; 9 देशातील 14 अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त, भारताच्या हद्दीतही अमेरिकेची थेट घुसखोरी
अमेरिका इस्त्रायलच्या इराण हल्ल्याचे 100 तास; एक हजारांवर मृत्यूमुखी, 17 इराणी जहाजे बुडाली; 9 देशातील 14 अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त, भारताच्या हद्दीतही अमेरिकेची थेट घुसखोरी
BJP Working Committee: राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपकडून कार्यकारिणीची घोषणा, उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी
भाजपकडून मुंबई प्रदेश कार्यकारिणीची घोषणा, उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
Embed widget