Vidhanparishad Election 2026 : राज्यातील विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2026) निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपनंतर (BJP) आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena UBT) महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आलं आहे. तर अद्याप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजूनही उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली नाहीत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Congress) गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी भेट घेतल्याचीमाहितीआहे.

मुख्यमंत्रीआणिउपमुख्यमंत्रीसुनेत्रापवार (Sunetra Pawar)या दोघांच्या वर्षा बंगल्यावर पाऊणतास झाली चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) अनुषंगाने नुकतीच (मंगळवारी, ता २८) बैठक पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांची फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेत माजी आमदार झीशान सिद्दिकी यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिभेटघेतल्याचीप्राथमिकमाहितीआहे. (Vidhan Parishad Election 2026)

Shivsena : शिवसेनेची देखीलरात्रीउशिरापर्यंत बैठक, निलम गोर्हे यांचे नाव जवळपास निश्चित?

दरम्यान, विधानपरिषद उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री उशिरा भेट झाल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंआहे. तर दुसरीकडे शिवसेनेची देखीलकाल (30 एप्रिलच्या) रात्रीउशिरापर्यंत बैठक सुरूच असल्याचेसमोरआलंआहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक होत असून विधान परिषदेसाठी निलम गोर्हे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचीमाहितीआहे. तर दुसऱ्या जागेसाठी बच्चू कड्डू यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचेदेखीलबोललंजातआहे. बच्चू कड्डू यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने कड्डूंची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेआताएकनाथ शिंदे बच्चू कडू यांना उमेदवारी देणार की पक्षातील नेत्यांनी हे पाहणं महत्वाचे ठरणारआहे. तरशिवसेनाआणिराष्ट्रवादीकडूननेमकीकुणाचीवर्णीलागणारहेहीपाहणंमहत्वाचंठरणारआहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026 उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026 उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026मतदानाची तारीख: 12 मे 2026मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजतानिवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026