Sunetra Pawar DCM Oath: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. सुनेत्रा पवार आज (31 जानेवारी) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar DCM Oath) शपथविधी होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान या शपथविधीपूर्वी विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होतेय. याबैठकीला राष्ट्रवादीचेसर्वआमदार, मंत्रीआणिनेते उपस्थित झालेआहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचा गटनेते पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मांडलाय. तरयाप्रस्तावालापक्षाचे जेष्ठ नेते म्हणूनमंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलंय. परिणामी, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झालीआहे. आता सायंकाळी 5 वाजताच्यासुमारास सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारआहे. त्यामुळेअजितपवारांच्यानंतरइथूनपुढेसुनेत्रापवारयांच्याखांद्यावरपक्षाचीधुराअसणारआहे.
Sunetra Pawar DCM Oath: आज मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची दिलीजाणार शपथ
दरम्यान, सुनेत्रा पवारांचा शपथविधी आज सायंकाळी 5 वाजता होणार आहे. सायंकाळी 5 ते 5 वाजून 12 मिनिटांपर्यंत हा शपथविधी सोहळा चालणार आहे. यावेळी मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. तर अतिरिक्त पदभार असलेले राज्यपाल आचार्य देवव्रत हेयावेळी शपथ देणार आहे. सोबतच आज फक्त सुनेत्रा पवारांचाच शपथविधीसोहळा होणार आहे.
सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपदासोबत कोणती खाती मिळणार? (Sunetra Pawar Ajit Pawar NCP)
अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदासोबतच अर्थ आणि इतर महत्वाचे खातेही होते. पण उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खाते वगळता इतर खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी कायम राहणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशनानंतर कदाचित अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा सुनेत्रा पवार यांना मिळू शकते. आज केवळ उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेतील. इतर कुणाचा ही शपथविधी नसणार आहे.
संबंधित बातमी:
Sunetra Pawar DCM Oath: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपदासोबत कोणती खाती मिळणार?; A टू Z माहिती
