एक्स्प्लोर

अजितदादांच्या जाण्याचं राजकारण नको, दादांची आई, मुलं आणि माझ्याएवढं मोठं दु:ख कोणाचं असू शकत नाही : सुनेत्रा पवार

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या जाण्याचं कोणीही राजकारण करु नये, असं म्हटलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी काल एक वक्तव्य केलं होतं, त्यावर आज सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

Sunetra Pawar Supriya Sule पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये असं म्हटलं आहे. दादांच्या आई, मुलं आणि माझ्या एवढं मोठं दुःख कुणाचंच असू शकत नाही, असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. माझा तपास यंत्रणांवर विश्वास आहे.आम्ही देखील दादांच्या अपघाताची चौकशीची मागणी करतो आहोत, फक्त ते मीडियासमोरच केली पाहिजे असं काही नाही असं त्यांनी म्हटलं होतं. खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वक्तव्य केलं होतं, त्याबाबत विचारलं असता सुनेत्रा पवार यांनी भूमिका मांडली. 

सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

खरं सांगायचं तर आदरणीय अजितदादा गेल्याचं सगळ्या महाराष्ट्राबरोबर , जी पोकळी निर्माण झाली आहे ती आणि आकाश कोसळलं आहे ते माझ्या आणि माझ्या मुलांपेक्षा कोणाला जास्त माहिती असणार? मला असं वाटतं दादांच्या या घटनेवर सगळ्यांचा काहीतरी आम्हाला निर्णय कळला पाहिजे. आम्ही देखील त्यादृष्टीनं प्रयत्नच करत आहोत, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.  

आम्ही आदरणीय पंतप्रधान साहेबांना, आदरणीय गृहमंत्र्यांना भेटून आलो आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात शब्द दिलेला आहे. तो शब्द ते पाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. नक्कीच तपास यंत्रणा सुद्धा आपलं काम करत आहे. माझा तपास यंत्रणांवर, कायदा आणि संविधानानं निर्माण केलेल्या गोष्टींवर विश्वास आहे. मला असं वाटतं की त्यांना आपण वेळ दिला पाहिजे. सतत मीडियामध्ये येणं म्हणजे अपडेट मिळणं असं नाही, असं सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं. 

मला असं वाटतं की वारंवार अशा गोष्टी करुन मीडिया ट्रायल होते की काय असं वाटतं. खरंतर आपल्या सर्वांनी विचार केला पाहिजे. दादांची आई, दादांची मुलं आणि मी याच्यापेक्षा त्याचं दु:ख कोणाला होणार आहे. त्याच्यामुळं त्यांच्या सगळ्या गोष्टींची लवकरात लवकर चौकशी व्हावी हे आम्हाला देखील वाटतं, आम्ही तसे प्रयत्न करत आहोत.  त्यामुळं असं समजण्याचं कारण नाही की आम्हाला काही होत नाही किवा काही नाही. मला एवढंच वाटतं की आपण तपास यंत्रणेला वेळ दिला पाहिजे. त्यांच्यावर माझा विश्वास आहे, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं.  

तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारच्या गोष्टी परत परत मीडियामध्ये होतात. दादांच्या जाण्याचं अशा प्रकारचं राजकारण कोणीच करु नये असं मला वाटतं, सुनेत्रा पवार म्हणाल्या.  

सुप्रिया सुळे काय म्हणालेल्या? 

अमित ठाकरेंनी फोटो हटवल्यानं तुम्ही एफआयआर केला, माझा भाऊ गमावला, सरकारमध्ये माझा भाऊ त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, त्यांचा एवढा मोठा अपघात होता, त्यांचा मृत्यू झाला, त्याचा आजपर्यंत एफआयआर झाला का?  अजित पवार त्यांच्याच सरकारमध्ये होते, त्यांचं सरकार आहे, अजित पवार यांचे 40 आमदार आजही त्यांच्याच सरकारमध्ये आहेत. मी माझ्या भावासाठी न्याय मागत आहे. अमित ठाकरेंवर केस होत असेल तर माझ्या भावाला न्याय कधी मिळणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला होता.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Shivsena Bhavan : शिवसेनाभवनासमोर पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडा, आदित्य ठाकरेंचा पोलिसांना इशारा
मुंबई पोलिसांनी शिवसेना भवनात घुसरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये हाय व्होल्टेज राडा 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
Advertisement

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Embed widget