Sunetra Pawar Chartered Flight : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ऊर्जा बचत, इंधनाचा कमी वापर आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचवेळी राज्यातील महायुतीच्या उपमुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या आवाहनाला हरताळ फासल्याचं दिसून येतंय. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मुंबई ते पुणे असा त्यांनी चार्टर्ड विमानाने प्रवास केल्याचा दावा करण्यात आला असून त्यावरून विरोधकांनी टीका केली आहे.

Continues below advertisement

एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आणि पर्यावरणपूरक वाहनांचा वापर केला. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या कथित चार्टर्ड विमान प्रवासामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.

Fuel Saving Appeal : मोदींच्या आवाहनानंतर सरकारकडून काटकसरीवर भर

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, सार्वजनिक वाहतूक आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्ला आणि डिजिटल बैठका घेण्याचे आदेश जारी केले आहेत. मुख्य सचिवांच्या परिपत्रकानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा मेट्रो, लोकल किंवा बसने प्रवास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Continues below advertisement

Maharashtra Ministers Travel : मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा ‘ग्रीन ट्रान्सपोर्ट’ संदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बाईकवरून विधानभवन आणि मंत्रालय असा प्रवास केला. त्यांच्यासोबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर केला. बहुतांश मंत्र्यांनीही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करत ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली. 

Buldhana Event : बुलढाण्यात शेकडो वाहनांची उपस्थिती

दरम्यान, बुलढाणा (Buldhana) येथील मॉडर्न डिग्री कॉलेजच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अमरावती विद्यापीठातील अधिकारी आणि प्राध्यापकांच्या शेकडो गाड्या दाखल झाल्याने इंधन बचतीच्या आवाहनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) उपस्थित होते. त्यांच्या ताफ्यात मात्र केवळ तीन गाड्या असल्याचे दिसून आलं.

Political Debate : चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप

सुनेत्रा पवार यांच्या प्रवासावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. सरकार खर्चकपात आणि ऊर्जा बचतीवर भर देत असताना काही नेत्यांच्या प्रवासपद्धतीवरून विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत.

ही बातमी वाचा :