एक्स्प्लोर

Narhari Zirwal NCP: नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक

Narhari Zirwal NCP: नरहरी झिरवळ हे शनिवारी दिवसभर नॉट रिचेबल असल्याची चर्चा रंगली होती. काल ते आदिवासी संमेलनाला जाणार होते. मात्र, तिकडेही ते गेले नव्हते.

Sunetra Pawar and Narhari Zirwal: अन्न व औषध प्रशासन खात्याच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांना पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंध खात्याने (ACB) रंगेहाथ पकडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) प्रतिमा डागाळली होती. लाचखोरीच्या या प्रकरणामुळे नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून अजित पवार यांच्या माघारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच मोठ्या कोंडीत सापडला आहे. हे प्रकरण पुढे करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विरोधकांकडून चिखलफेक सुरु आहे. अमोल मिटकरी वगळता पक्षाचा एकही बडा नेता नरहरी झिरवळ यांच्या समर्थनासाठी पुढे आला नव्हता. एकूणच या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता या अडचणीतून पक्षाला बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच पुढाकार घेतला आहे.

नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाबाबत चर्चा करण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची सोमवारी संध्याकाळी सहा वाजता तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. नरहरी झिरवळ प्रकरणात नेमक काय झालं, याची सत्यता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य समजून घेणार आहेत. जेणेकरुन या प्रकरणात पुढे काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय बैठकीत घेतला जाईल. याशिवाय, बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठीच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीबाबतदेखील चर्चा पार पडणार आहे. पुढील 15 दिवसांत प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Narhari Zirwal: नरहरी झिरवळ कोणत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडले?

राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालय कार्यालयातील लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पैसे घेताना रंगेहाथ पकडले होते. या घटनेमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. राजेंद्र ढेरंग यांनी एका औषध दुकानदाराचा निलंबित परवाना पुन्हा देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. यापैकी 35 हजार रुपये स्वीकारताना राजेंद्र ढेरंग एसीबीच्या जाळ्यात सापडले होते. त्यामुळे या खात्याचे मंत्री असलेल्या नरहरी झिरवळ यांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांच्या मंत्रि‍पदावर टांगती तलवार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

आणखी वाचा

नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण, आदिवासी संमेलनाला गेलेच नाहीत, लाचखोरी प्रकरणामुळे प्रचंड कोंडी

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Rohini Khadse on Chitra Wagh: वि'चित्रा' ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना संतप्त सवाल
वि'चित्रा' ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना संतप्त सवाल
Saamana Agralekh On Gas Shortage: सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Embed widget