Suhas Kande: नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे (Nandgaon Assembly Constituency) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. येवला येथे विविध गणेश मंडळांना (Ganesh Mandals) भेटी देत असताना आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. “अनेक विसर्जन करायचे आहेत आधी गणपती बाप्पाचे विसर्जन करू या..मग बाकीचे बघू..!” असं विधान सुहास कांदे यांनी केलं. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा रोख नेमका कोणाकडे होता, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
येवला शहरातील शिवशंभो वॉरियर्स गणेश मंडळाला आमदार सुहास कांदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गणरायाची आरती करून दर्शन घेतलं. येवलेकरांचं दुःख दूर करावं, असं साकडंही त्यांनी गणरायाला घातलं. यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. याच भेटीदरम्यान आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या विधानामुळे आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
Suhas Kande: "आधी गणपती बाप्पाचे विसर्जन करू या, मग बाकीचे बघू"
सुहास कांदे म्हणाले, “अनेक विसर्जन करायचे आहेत आधी गणपती बाप्पाचे विसर्जन करू या..मग बाकीचे बघू..!” त्यांच्या या वक्तव्याचा नेमका संदर्भ काय, तसेच ‘बाकीचे विसर्जन’ असा उल्लेख त्यांनी कोणाला उद्देशून केला, याबाबत येवल्यात विविध राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे येवला हा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता, हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. मात्र, सुहास कांदे यांनी केलेल्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
Suhas Kande: शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्यात येणार
दरम्यान, येवला तालुक्यात दुष्काळाची (Drought) परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे सरसकट पंचनामे (Crop Damage Panchnama) करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार सुहास कांदे यांनी यावेळी दिली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
