एक्स्प्लोर

Nagpur Politics: अनिल सोले अकरावी ते बीएससीपर्यंत गणित शिकवणारे, अन् राजकीय गुरु, ते शिष्याला अडचणीत आणणार नाही; गुरु-शिष्य परंपरेची आठवण करून देत सुधाकर कोहळेंची भावनिक साद

Nagpur Graduate Constituency Election 2026 : गुरु-शिष्य परंपरेची भावनिक साद घालत अनिल सोले भाजप विरोधात बंडखोरी करणार नाही, अशी अपेक्षा भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केली आहे.

Nagpur Graduate Constituency Election 2026 : 'अनिल सोले  (Anil Sole) हे माझे गुरु आहेत. त्यांनी मला अकरावीपासून बीएससीपर्यंत गणित आणि त्यानंतर राजकारण शिकवले आहे. त्यामुळे गुरु कधीच शिष्यावर नाराज होऊ शकत नाही. अशी गुरु-शिष्य परंपरेची भावनिक साद घालत अनिल सोले भाजप विरोधात बंडखोरी करणार नाही, अशी अपेक्षा भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale)यांनी व्यक्त केली आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज सुधाकर कोहळे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. तर पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून याच मतदारसंघातून आमदार राहिलेले माजी आमदार अनिल सोले (Anil Sole) बंडखोरीच्या भूमिकेत आहेत. (Sudhakar Kohale to Anil Sole)

मात्र, सुधाकर कोहळे यांनी अनिल सोले यांना विद्यार्थीदशेत गणिताचे धडे दिले. नंतर राजकारणही शिकवले. त्यामुळे माझ्या जीवनात गुरुच्या भूमिकेत राहिलेले अनिल सोले आपल्या शिष्यविरोधात बंडखोरी करणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान अनिल सोले पक्षाचे निष्ठावंत राहिले, तर मी पण 35 वर्षांपासून पक्षाचा निष्ठावंत आहे. सोलेंच्या बंडखोरीबद्दल निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते करतील, असं सांगून अनिल सोले यांची बंडखोरी शमावणे हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जबाबदारी असल्याची आठवण ही कोहळे यांनी करून दिली.

Nagpur BJP News: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची रॅली भाजपने केली रद्द

दरम्यान, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पदवीधर विभाग मतदारसंघासाठी उमेदवार सुधाकर कोहळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली कार्यकर्त्यांची रॅली भाजपने रद्द केली आहे. आधीच्या नियोजनाप्रमाणे ही रॅली स्वागत लॉन येथून विभागीय आयुक्त कार्यालयपर्यंत जाणार होती. पण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशे वादन आणि रॅली रद्द करण्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आदेशाप्रमाणे ही शांततेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

Nagpur Graduate Constituency : संघपरिवातील पदाधिकारी रमण सेनाडेही मैदानात, भाजपची डोकेदुखी वाढणार?

दरम्यान, रमण सेनाड हे विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर आयामचे विदर्भसह प्रांतप्रमुख आहे. मी मागच्या पन्नास वर्षांपासून संघ परिवार काम करतो, तीस वर्षांपासून भाजपमध्ये काम करत आहे. अनेक वेळा मी उमेदवारी मागितली, मात्र पक्षाने तिकीट नाकारली. तरी मी प्रामाणिकपणे पक्ष व संघाचे काम सुरु ठेवले. मात्र आता कार्यकर्त्यांच्या आग्रहास्त उमेदवारी अर्ज भरत असल्याचे सेनाड यांनी सांगितले. त्यामुळे आता नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपची डोकेदुखी अधिक वाढली असून या बंडखोरांना पक्ष कशी समजूत काढतं हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

MLC Election Schedule: विधानपरिषद निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक

अधिसूचना जारी (Notification Date): 29 सप्टेंबर 2026 

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख (Nomination Last Date): 6 ऑक्टोबर 2026

अर्जांची छाननी (Scrutiny): 7 ऑक्टोबर 2026

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Withdrawal Last Date): 9 ऑक्टोबर 2026

मतदानाची तारीख व वेळ (Poll Date & Time): 23 ऑक्टोबर 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4)

मतमोजणी व निकाल (Counting Date): 27 ऑक्टोबर 2026

इतर महत्वाच्या बातम्या 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut:
"विलीनीकरण-विलीनीकरण, किंवा ऑलम्पिक खेळ खेळता येईल का? मर्जर-मर्जर, फार इंट्रेस्टिंग..."; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचा मिश्कील टोला, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Chhath puja: मुंबईतील वडाळा स्थानकात छटपूजेनिमित्त रेल्वे अधिकाऱ्याने वाजवले भोजपुरी गाणे, ठाकरे गट आक्रमक, बदलापूरमध्येही वातावरण तापलं
मुंबईतील वडाळा स्थानकात छटपूजेनिमित्त रेल्वे अधिकाऱ्याने वाजवले भोजपुरी गाणे, ठाकरे गट आक्रमक, बदलापूरमध्येही वातावरण तापलं
NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
माझा भाऊ मंत्री होऊ दे, भाऊबीजनिमित्त सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, म्हणाल्या, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय
माझा भाऊ मंत्री होऊ दे, भाऊबीजनिमित्त सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, म्हणाल्या, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut:
"विलीनीकरण-विलीनीकरण, किंवा ऑलम्पिक खेळ खेळता येईल का? मर्जर-मर्जर, फार इंट्रेस्टिंग..."; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचा मिश्कील टोला, नेमकं काय म्हणाले?
Hardik Pandya MI: आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
Tukaram Mundhe on Milk and Ghee: तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
Sinhagad Educational Institute: सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
Pune Crime News: पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
Mumbai Local Crime News: मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीच्या अंगाला नराधमांचा नको तिथे स्पर्श, वाद, विरोध करताच ट्रेनखाली ढकलून दिलं; डावा हात कापला गेला, मिरा-भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीच्या अंगाला नराधमांचा नको तिथे स्पर्श, वाद, विरोध करताच ट्रेनखाली ढकलून दिलं; डावा हात कापला गेला, मिरा-भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Embed widget