Sudhakar Badgujar Expelled from Thackeray Camp: पक्षात नाराजी व्यक्त करणे, हा काही गुन्हा नाही. मात्र या संदर्भात माझाशी कुठलीही चर्चा झाली नाही. मी सध्या नाशिकच्या बाहेर आहे. त्यामुळे मी पक्षाच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहू शकलो नाही. माझा नियोजित दौरा असल्याचे मी कळवले ही होतं. परंतु पक्षवर नाराजी व्यक्त कारणं किंवा मुख्यमंत्र्याना भेटल्यावरून जर अशी कारवाई होत असेल तर मला वाटतं हे चुकीची आहे. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या शिवसेनेचे (UBT Shiv Sena Nashik) उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी दिली आहे. सुधाकर बडगुजर यांनी पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पक्षाने कारवाईचा बडगा उगारत पक्षातून हकालपट्टी केली आहे. या कारवाईवर आपली पहिली प्रतिक्रिया देताना पक्षाने केलेली कारवाई चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाने आज (4 जून) पत्रकार परिषदे घेतली. ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी.जी.सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. या पत्रकार परिषदेवेळी उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते. नियोजित कार्यक्रमासाठी नाशिक बाहेर असल्याने सुधाकर बडगुजर पत्रकार परिषदेला गैरहजर राहिले. महानगर प्रमुख विलास शिंदे हे मात्र उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान पत्रकार परिषद सुरू असतानाच बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षप्रमुखांनी संधी दिली असती तर भेटलो असतो, पण....
पक्षाने कोणाची हकलपट्टी करायची कोणाला पक्षात ठेवायचं हा पक्षाचा निर्णय आहे. त्यावर मी सध्या काहीही बोलू इच्छित नाही. मी योग्य वेळी माझी प्रतिक्रिया देईन. माझी पुढची भूमिका काय असेल हे मी वेळ आल्यावर सांगेन. पक्षातून हकालपट्टी होईल, अशी कोणतीही कुणकुण लागलेली नव्हती. मी पक्षातील भूमिकांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा असेल तर ते योग्य नाही. पक्षप्रमुखांनी संधी दिली असती तर भेटलो असतो. पण आता हकलपट्टी झाली आहे तर पक्षप्रमुखांचे भेट घेण्याचा प्रश्न नाही. अचानक निर्णय झाला, पक्षाचा निर्णय होता, पक्षाने घेतला. इतर कोण कोण नाराज आहेत त्यांची नावं मी घेणार नाही. असेही सुधाकर बडगुजर यावेळी म्हणाले.
इतरअ महत्वाच्या बातम्या