Mumbai Students Morcha : नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा (Dharmendra Pradhan Resignation) दिला आहे. दिल्लीत झालेल्या या घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही हालचालींना वेग आला आहे. असेअसतानाएकीकडेदिल्लीच्याजंतरमंतरवरीलसीजेपी (CJP) आणि विद्यार्थ्यांचंआंदोलनसंपलंअसलंतरी मुंबईत पुन्हाएकदा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी नऊ ऑगस्टला विविध विद्यार्थी संघटना रॅली (Mumbai Students Morcha) काढणार असल्याचीमाहितीआहे. नीट परीक्षा पद्धतीत पारदर्शकता, महाराष्ट्रातील टीईटी पेपर फुटी प्रकरण, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न, मराठी शाळांचे प्रश्न, अशा अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन एकत्रित आंदोलनाची चळवळ सुरू ठेवणार असल्याचीमाहितीआहे.Mumbai Students Morcha

Continues below advertisement

Mumbai Students Morcha: विद्यार्थी प्रश्नांसाठी देशभरातील विविध विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचं आवाहन

दरम्यान, देशभरात विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू केलेलं आंदोलन आता मुंबईमध्ये सुरूच राहणार असल्याचेचित्रआहे. मुंबईतील विविध विद्यार्थी संघटना एकत्र येत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी ही चळवळ सुरू ठेवणार असल्याचा निर्णय विविध विद्यार्थी संघटनांनी घेतला आहे. प्रश्न मांडण्यासाठी राजकीय पक्ष नाही तर विद्यार्थी एकत्र येऊन सुद्धा लढत दिला जाऊ शकतो, असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये आल्याचं संघटनांचे म्हणणं आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रश्नांसाठी विविध विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचं आवाहन करत विद्यार्थी संघटनांची ही चळवळ सुरू राहणार आहे.

Continues below advertisement

Students Morcha: क्रांती दिनीवि द्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत वाचा फोडण्यासाठी विद्यार्थी संघटना आंदोलन करणार

दरम्यान, क्रांती दिनाच्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्टला पुन्हा एकदा राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत वाचा फोडण्यासाठी विद्यार्थी संघटना एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. यात कॉक्रोच जनता पार्टी, छात्र भारती, AISF, SFI अशा विविध विद्यार्थी संघटना एकत्र येऊन ही चळवळ सुरू ठेवणार असल्याचीमाहिती विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनीदिलीआहे.

CJP Protest: लाठीचार्ज आणि अश्रुधूरावरूनही वाद

पेपरफुटी (Paper Leak) प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केले होते. त्यानंतर CJP ने 20 जुलै रोजी संसद मोर्चाची घोषणा केली होती. मोर्चादरम्यान गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा दलांनी लाठीचार्ज (Lathi Charge) केला आणि अश्रुधूराचे गोळे डागले होते. या घटनेवरून विरोधकांनी संसदेतही सरकारला धारेवर धरले होते. आता पॅलेट गन वापरल्याच्या दाव्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले असून, चौकशी अहवालानंतर नेमके काय घडले? याबाबत अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या