एक्स्प्लोर

सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण

युसूफ पठाण ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे खासदार असून ते बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

मुंबई : देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा (Vidhansabha) निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला असून ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची चांगलीच वाताहत झाल्याचं पाहायला मिळालं. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला अवघ्या 80 जागांवर समाधान मानावं लागलं. मात्र, त्यानंतरही त्यांचा राजकीय संघर्ष सुरूच असून ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. एकीकडे तृणमूल काँग्रेसच्या राजकीय भविष्याची चर्चा सुरू असतानाचा दुसरीकडे टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज माजी क्रिकेटर युसुफ पठाणपर्यंत पोहोचवल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, आता स्वत: सौरव गांगुलीने (Saurav ganguly) या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं असून आपण कधीही ममता बॅनर्जींचा (Mamta bannerjee) मेसेज युसूफपर्यंत पोहोचवला नसल्याचं त्याने म्हटलं आहे. 

पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या बहरामपूर लोकसभा मतदारसंघाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. याच मतदारसंघाबाबत सध्या उलट-सुलट चर्चा सुरू असून ममता बॅनर्जींनी सौरव गांगुलीमार्फत येथील खासदार युसूफ पठाण यांना राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली होती. भविष्यात ममता बॅनर्जींना संसदेत पाठविण्यासाठी तृणमूलकडून हा राजकीय डाव आखला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, सौरव गांगुलीने हे वृत्त फेटाळले असून मी कुठलाही निरोप युसूफ पठाणला दिला नसल्याचं सौरवने स्पष्ट केलं. दरम्यान, युसूफ पठाण ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे खासदार असून ते बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र, विधानसभेतील पराभवानंतर आता ममता बॅनर्जी त्याच जागेवरुन संसदेत जाऊ इच्छित असल्याची माहिती आहे. 

कुठल्याही राजकीय घडामोडीत सहभाग नाही

युसूफ पठाणसोबत माझं कुठलंही बोलणं झालं नाही, मी कुठलाही राजकीय संदेश, निरोप युसूफला दिला नाही. तसेच, ममता बॅनर्जींनी मला कुठलाही राजकीय संदेश पोहोचवण्यास सांगितले नव्हते किंवा मी कुठल्याही राजकीय घडामोडीत सहभागी नाही, असेही सौरव गांगुलीने चर्चेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तर, माध्यमांनीही जबाबदारीने वृत्तांकन करायला हवं, अशा बातम्या देताना खात्री करुनच बातमी करायला हवी, असेही सौरव गांगुलीने म्हटले आहे. त्यामुळे, माझ्यावर लावण्यात येत असलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत, असे गांगुलीने स्पष्ट केले.   

हेही वाचा

Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Nilesh Rane : 'ज्यांनी राणेंचा तिरस्कार केला, ते स्वतःच 'हिट विकेट' झाले', निलेश राणेंचा विनायक राऊतांना जोरदार टोला!
'ज्यांनी राणेंचा तिरस्कार केला, ते स्वतःच 'हिट विकेट' झाले', निलेश राणेंचा विनायक राऊतांना जोरदार टोला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
Embed widget