एक्स्प्लोर

Solapur ZP Election : मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्याप्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल; दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा ठपका

Solapur ZP Election : सोलापुरातील मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन  (EVM Machine) धाब्यावर आढळल्याच्या प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Solapur ZP Election : सोलापुरातील मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन  (EVM Machine) धाब्यावर आढळल्याच्या प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. परवानगी शिवाय ईव्हीएम  (EVM Machine) असलेले वाहन स्ट्रॉंगरूम बाहेर नेल्याने वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालक दिनेश संजय भांगे यांच्यावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाहनात ईव्हीएम मशीन असल्याची माहिती असूनही परस्पर स्ट्रॉंगरूम मधून ईव्हीएम बाहेर नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur ZP Election 2026)

दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी ते वाहन परत मागवले असताना ते परत नेण्यास टाळाटाळ केली असल्याचेही पुढे आले आहे. ईव्हीएम धाब्याबाहेर गाडीत राहिल्याने लोकांचा जमाव जमून दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली, असा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएनएस कलम 222, 223 नुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणुकीत सेवेत क्षेत्रीय अधिकारी असलेल्या प्रसाद पाटील यांनी याबाबत फिर्याद दिलीय. त्यानुसार हि कारवाई करण्यात आली आहे.

Solapur ZP Election 2026 : मतदान प्रक्रियेत कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार आढळून आलेला नाही

मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्र सुरक्षा कक्षात वेळेत जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होतं. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मोहोळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली गेलेली नाहीत. ती राखीव स्वरूपातील होती. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार आढळून आलेला नाही. तरीसुद्धा ही मतदान यंत्र वेळेत सुरक्षा कक्षात जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

Solapur ZP Election 2026 : नेमकं प्रकरण काय?

मोहोळ तालुक्यातील 220 मतदान केंद्रांवर 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानानंतर काही राखीव मतदान यंत्र तात्काळ सुरक्षा कक्षात जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला. कुरूल (55) गटातील काही मतदान केंद्रांसाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडील 02 कंट्रोल युनिट व 02 बॅलेट युनिट यासंदर्भात हा प्रकार घडला. दरम्यान, ही मतदान यंत्रे एका वाहनातून खासगी ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिक व राजकीय प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. घटनेची माहिती मिळताच निवडणूक प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सर्व उपस्थितांच्या साक्षीने पंचनामा करण्यात आला व ही मतदान यंत्रे राखीव स्वरूपातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सदर मतदान यंत्रे शासनाच्या सुरक्षा कक्षात सीलबंद करण्यात आली आहेत.

BMC standing Committee: मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेची स्थायी, शिक्षण समिती भाजपकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळालं?

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
TMC Candidate List : ममता बॅनर्जींचा धमाका, विधानसभेसाठी एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर
मोठी बातमी : ममता बॅनर्जींचा धमाका, एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर, नंदीग्राममधून स्वत: लढणार नाहीत!
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
Gold Silver Price Today: युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Embed widget