एक्स्प्लोर

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

मोहिते पाटील कुटुंबावर टीका केल्याशिवाय जयकुमार गोरे यांचं दुकान चालत नाही, असा पलटवार खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय.

सोलापूर : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत थेट पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar gore) विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील (Dhairysheel mohite patil) यांच्यातच लढत पाहायला मिळत आहे. येथे (Solapur) भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंत देशमुख यांच्यात निवडणूक होत आहे. मात्र, ही निवडणूक पालकमंत्र्यांच्या प्रतिष्ठेची झाली असून जयकुमार गोरे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता पहिल्यासारखी परिस्थिती नाही, साधा कोतवालही नमस्कार घालत नाही, असे म्हणत मोहिते पाटलांना जयकुमार गोरेंनी लक्ष्य केलं होतं. त्यावर, आता धैर्यशील मोहिते पाटलांनी पलटवार केला आहे. 

मोहिते पाटील कुटुंबावर टीका केल्याशिवाय जयकुमार गोरे यांचं दुकान चालत नाही, असा पलटवार खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय. ‘’जयकुमार गोरे हे पालकमंत्री आहेत की पोस्टमन, हे त्यांनी आधी ठरवावं, पालकत्व या शब्दाचा अर्थ त्यांनी डिक्शनरीमध्ये शोधावा‘’, अशी खोचक टीका देखील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली. दरम्यान मागील दोन दिवसात पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पंढरपूर तालुक्यात केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत, या केळी उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे. यावेळी, सोलापूर विधानपरिषद मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं. तसेच, जयकुमार गोरे यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलंय. 

सोलापूरच्या जनतेनं आम्हाला उभं केलंय 

मोहिते पाटील कुटुंबाला सोलापूरच्या जनतेने उभं केलंय, आम्हाला संपवायचं की उभं करायचं हे जनता ठरवेल. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत असलो तरी पवार साहेब, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांसह सर्वच  मुख्यमंत्र्यांनी ज्या त्या काळात आम्हाला मदत केली. ज्यांनी मदत केली त्यांचे आम्ही जाहीर आभार मानले आहेत. मला हे समजतं नाही की, ही विधानपरिषदेची निवडणूक आहे, मोहिते पाटील कुटुंबातील कोणी उमेदवार नाही तरी हे आमच्यावर टीका करत सुटलेत, असा टोलाही मोहिते पाटलांनी लगावला.  

जयकुमार गोरे हे पालकमंत्री की पोस्टमन

मतदारांसाठी, शहर, जिल्ह्यासाठी काय करणार हे त्यांनी सांगावं, ते एकही शब्द त्यावर बोलत नाहीत. कुर्डुवाडीमध्ये लोकांच्या घराचा प्रश्न आहे, असे प्रत्येक नगरपालिकेचे प्रश्न आहेत, स्मशानभूमीचे प्रश्न संपवतो म्हणाले होते, पण अजूनही ते प्रश्न कायम आहेत. आम्ही उमेदवार नसतानाही आमच्यावर टीका करणे यावरून त्यांची दिशा काय हे मतदारांना समजतंय. मोहिते पाटील कुटुंबावर टीका केल्याशिवाय यांचे दुकान चालत नाही. ते पालकमंत्री की पोस्टमन हे त्यांनी आधी ठरवावं, त्यांना मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिलीय, पालकत्व या शब्दाचा अर्थ त्यांनी डिक्शनरीमध्ये शोधावा मी 16 मतापासून सुरुवात केलीय, मतदार भरभरून आम्हाला बोलत आहेत, प्रतिसाद देत आहेत, भाजपसह मी 616 मतदारांना भेटतोय, असेही मोहिते पाटील यांनी म्हटलं. 

शेतकऱ्यांना मदत मिळावी

पावसामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे, केळीच्या बागा पूर्ण उध्वस्त झाल्या आहेत 100 टक्के या बागांचे नुकसान झालं आहे, आधी जागतिक युद्धामुळे केळीचे दर पडले होते. आता, कुठे दर वाढले होते आणि अशात नैसर्गिक संकटामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशी मागणी देखील मोहिते पाटलांनी केली. 

हेही वाचा

'इतरांना जो न्याय मिळाला तो मलाही मिळायला पाहिजे होता'; नाराजीबाबत विचारताच छगन भुजबळांचं सूचक उत्तर, म्हणाले...

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Eknath khadse: 'होय, मी दिल्लीला गेलो होतो, अमित शाहांनीच मला फोन करून बोलावलेलं'; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
'होय, मी दिल्लीला गेलो होतो, अमित शाहांनीच मला फोन करून बोलावलेलं'; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चा पुन्हा रंगल्या; गिरीश महाजनांचा नाथाभाऊंना खोचक टोला, म्हणाले, 'त्यांची थेट दिल्लीला...'
एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चा पुन्हा रंगल्या; गिरीश महाजनांचा नाथाभाऊंना खोचक टोला, म्हणाले, 'त्यांची थेट दिल्लीला...'
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: हनिमूनमध्ये शारीरिक संबंधास नकार, मी प्रश्न विचारताच पती म्हणाला...; विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय?
हनिमूनमध्ये शारीरिक संबंधास नकार, मी प्रश्न विचारताच पती म्हणाला...; विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
Solapur Crime News: 74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
Pune Moshi Building Collapse: घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Harshit Rana Ruled Out of ODI Series : इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
Maharashtra Farmers: आधीच पावसाची पाठ, त्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट; राज्यातील बळीराजा अस्मानी अन् सुलतानी संकाटात, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी रडकुंडीला 
आधीच पावसाची पाठ, त्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट; राज्यातील बळीराजा अस्मानी अन् सुलतानी संकाटात, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी रडकुंडीला 
Pune Crime News: नवऱ्याची महिलेशी मैत्री; पत्नीने जाब विचारताच वाद अन् संताप, नवऱ्याने घर पेटवलं, बायको वाचली पण घरातील तीन निष्पाप मांजरींचा होरपळून मृत्यू, पुण्यातील घटना
नवऱ्याची महिलेशी मैत्री; पत्नीने जाब विचारताच वाद अन् संताप, नवऱ्याने घर पेटवलं, बायको वाचली पण घरातील तीन निष्पाप मांजरींचा होरपळून मृत्यू, पुण्यातील घटना
Embed widget