Solapur Vidhan Parishad Election Result 2026: 'इतका अहंकार बरा नाही' असंम्हणत सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत (Solapur Vidhan Parishad Election 2026) विजय झाल्यानंतर राजेंद्र राऊत यांनी मोहिते पाटलांवर (Dhairyasheel Mohite Patil) जोरदार टीका केलीआहे. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव अपघात होता. मात्र, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा आमदारकीची संधी दिली. सोलापूर विधानपरिषदेचे विजयी मिळवल्यानंतर उमेदवार राजेंद्र राऊत (Rajendra Raut Victory) यांनीही पहिली प्रतिक्रिया दिलीआहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्र राऊत यांच्याशी फोनवरून संवादसाधलाआहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्र राऊत यांचं अभिनंदन केलंआहे. विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या विजयाच्या शुभेच्छा मुख्यमंत्री यांनी दिल्या. तर राऊत यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
Rajendra Raut Victory : राजेंद्र राऊत यांच्या समर्थकाकडून फटाक्यांची अतिशबाजी, गुलालची उधळण करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष
माळशिरसमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात आतापर्यंत एकटा रामभाऊ लढत होता, आता रामभाऊ आणि राजाभाऊ दोघे मिळून लढतील. असेम्हणत माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी भाजपच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिलीआहे. सध्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर राजेंद्र राऊत यांच्या समर्थकाकडून मोठा जल्लोष करण्यातयेतआहे. फटाक्यांची अतिशबाजी, गुलालची उधळण करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यातयेतआहे. तर अदृश्य शक्ती मोहिते पाटलांच्या कामी आली नसल्याचे बॅनरबाजी करतं कार्यकर्त्यांकडून टीका केली जातेय. मोहिते पाटील यांचा तात्या विंचूच्या रूपात फोटो शेयर करतं कार्यकर्त्यांकडून खिल्ली उडवली जातअसल्याचेहीयावेळीदिसूनआलं.
सोलापूर विधानपरिषदे निकाल (Solapur Vidhan Parishad Election Result 2026)
एकूण मतदार - 616
झालेले मतदान - 614
NCP SP, वसंतराव देशमुख - 118
BJP, राजेंद्र राऊत - 483
एकूण अवैध - 13
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत एकूण मतदार संख्या 616 (Solapur Vidhan Parishad Election Result 2026)
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत एकूण मतदार संख्या जिल्ह्यातील स्थानिक संस्थांमध्ये एक जिल्हा परिषद, एक महानगरपालिका व 17 नगरपरिषद/ नगरपंचायत अशा एकूण 19 संस्था असून त्यातील मतदारसंख्या 544 आहे. याशिवाय 49 नामनिर्देशित व 23 अध्यक्ष मिळून एकूण मतदारसंख्या 616 इतकी आहे. या निवडणुकीसाठी एकूण 15 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. अखेर 2 उमेदवार निवडणुकीत उभे राहिले आहेत. जिल्ह्यात एकूण 6 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या मध्ये कुर्डूवाडी येथे 80 मतदार, उत्तर सोलापूर येथे 188, दक्षिण सोलापूर येथे 89, पंढरपूर येथे 100, मंगळवेढा येथे 62 व अकलूज येथे 97 मतदारांची व्यवस्था केली होती. मतदान केंद्रांवर तहसीलदार हे केंद्राध्यक्ष असतील. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
