Sanjay Raut and Jaykumar Gore: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्याविरोधात केलेल्या शिवराळ टीकेवरून सोलापुरातील राजकारण (Solapur politics) तापले आहे. राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि भाजपने ठिकठिकाणी निषेध नोंदवल्यानंतर, आता ठाकरे गटाचे शिवसैनिक संजय राऊत यांच्या समर्थनासाठी थेट रस्त्यावर उतरले आहेत.

Continues below advertisement

ज्या चार हुतात्मा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी राऊतांचा पुतळा दहन केला होता, त्याच ठिकाणी शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक घातला. मात्र, या आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांची जयकुमार गोरेंवर टीका करताना जीभ घसरली.

Sanjay Raut and Jaykumar Gore: राऊत साहेब जे बोलले ती महाराष्ट्राची भाषा

संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिलेल्या शिवीचे समर्थन करताना जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण म्हणाले, "जिथे भाजपा कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला त्या ठिकाणी आम्ही गोमूत्र शिंपडत आणि राऊत साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. पालकमंत्र्यांना आमचा इशारा आहे संजय राऊत तर आमचे नेते आहे. तुम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या देखील नादाला लागू नका. बालाजी सरोवर (हॉटेल) ला बसून तुम्ही काय धंदे करतात? सोलापुरात काय लफडे करतात? आरक्षित जागा विकून हजारो कोटी कमवायचे, हे धंदे बंद करा अन्यथा सोलापूर बंद करून तुमच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करू. राऊत साहेब जे बोलले ती महाराष्ट्राची भाषा आहे, त्यात वेगळं काही नाही. संजय राऊत तर फक्त येडXXX म्हटलेत, मी जयकुमार गोरेंना लिंगपिसाट म्हणतो" आता या वक्तव्यावर जयकुमार गोरे यांचे समर्थक काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  दरम्यान, जयकुमार गोरेंच्या विरोधात आणि संजय राऊत यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Continues below advertisement

Sanjay Raut and Jaykumar Gore: संजय राऊतांवर सोलापुरात गुन्हा दाखल 

या वादाची सुरुवात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या एका वक्तव्याने झाली होती. "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अस्तित्व आता राहिलेले नाही, ते पुढची निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील," असा टोला गोरेंनी लगावला होता. याला उत्तर देताना संजय राऊत यांनी शिवराळ भाषा वापरली होती. या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jaykumar Gore on Sanjay Raut: जयकुमार गोरेंचा टोला 

संजय राऊत यांच्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उमटले आहेत. मोहोळ तालुक्यातील (Mohol) अनगर गावात भाजप नेते राजन पाटील यांचे सुपुत्र अजिंक्यराणा पाटील आणि कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून पुतळा दहन केला. तर दुसरीकडे जयकुमार गोरे यांनी, "कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही," असा खोचक टोला लगावत राऊतांना डावलण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं