एक्स्प्लोर

Solapur News: नगरपंचायत निवडणुकीचा संघर्ष चिघळला, भाजप नेत्याकडून अजितदादांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पाठलाग? पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालय गाठलं

Solapur News: अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जावरून मोहोळ तालुक्यात मोठं राजकीय नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

Solapur News: अनगर नगरपंचायत (Angar Nagar Panchayat) नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जावरून मोहोळ तालुक्यात मोठं राजकीय नाट्य रंगलं असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Faction) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे (Ujjwala Thite) यांना अर्ज भरताना अडथळे येत असल्याचा आरोप होत आहे. अखेर पोलिस संरक्षण मिळाल्यानंतर त्या पहाटेच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. उज्ज्वला थिटे यांनी भाजप (BJP) नेते राजन पाटील (Rajan Patil) यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. उज्ज्वला थिटे या आज पहाटे 5 वाजताच अनगर नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्या आहेत. त्यांच्यासोबत सोलापूर ग्रामीण पोलिसांचा शस्त्रधारी ताफा होता. नगरपंचायत परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून कार्यालयाच्या चारही बाजूंनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार असून त्यापूर्वीच मोठ्या संख्येने ग्रामस्थ कार्यालयाबाहेर जमू लागले आहेत.

Solapur News: उज्ज्वला थिटेंचा आरोप

उज्ज्वला थिटे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी असा आरोप केला की, भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटील हे निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे थिटे यांनी उमेदवारी अर्ज भरू नये, यासाठी रस्त्यांवर जागोजागी अडथळे उभे केले जात आहेत. उसाचे ट्रॅक्टर रस्त्यावर लावून जाण्याचे मार्ग बंद केले जात आहेत. थिटे यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली आहे. काल अर्ज दाखल करण्याच्या प्रयत्नादरम्यान, राजन पाटील यांच्या समर्थकांकडून पाठलाग केल्याचा आरोप थिटे यांनी केला. पोलिसांनी योग्य संरक्षण दिलं नाही म्हणून त्यांनी मोहोळ पोलीस स्टेशनबाहेर उभं राहून संतापही व्यक्त केला होता.

Solapur News: पोलीस संरक्षणात उज्ज्वला थिटे कार्यालयात पोहोचल्या  

उज्ज्वला थिटे यांनी वाढत्या तणावाच्या परिस्थितीत पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आली आणि थिटे यांना सुरक्षा देण्यात आली. पोलिस बंदोबस्त तैनात झाल्यानंतर थिटे सुरक्षितपणे अनगरमध्ये पोहोचल्या आणि अर्ज दाखल करण्यास सज्ज झाल्या. आता त्या आपला अर्ज भरू शकतील की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Solapur News: बिनविरोध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघर्ष वाढला

अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपकडून राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. राजन पाटील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप होत असल्याने तणाव अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अनगर नगरपंचायतीत राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता अधिक तीव्र झाली आहे.

आणखी वाचा 

Eknath Shinde & Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, चाकणमध्ये ठाकरे-शिंदेंची शिवसेना एकत्र

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंनी शिंदेंची हकालपट्टी केली होती, मग विधानसभा अध्यक्षांनी त्यांना पक्षाचा नेता कसा ठरवला? कपिल सिब्बलांकडून नार्वेकरांच्या निर्णयाची चिरफाड
ठाकरेंनी शिंदेंची हकालपट्टी केली होती, मग विधानसभा अध्यक्षांनी त्यांना पक्षाचा नेता कसा ठरवला? कपिल सिब्बलांकडून नार्वेकरांच्या निर्णयाची चिरफाड
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Embed widget