Solapur Municipal Corporation Election 2026: अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी तात्काळ अर्ज मागे घ्या, अन्यथा पक्षशिस्तीनुसार कारवाई केली जाईल, असाइशारा सोलापूर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलाआहे. ज्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली नाही, त्यांनी पक्षहित लक्षात घेऊन माघार घ्यावी. सोबतच अर्ज माघारी घेऊन अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सहभागी व्हावे. माघार घेणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षाकडून योग्य दखल घेतली जाईल. असे सांगत भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना सूचनावजाइशारादिलाआहे. त्यामुळेआतापक्षातील बंडखोर कार्यकर्तेनेमकीकायभूमिकाघेतातहेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.
Solapur Election 2026: अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस, कार्यकर्तेनेमकीकायभूमिकाघेतातयाकडेलक्ष
सोलापुरात भाजपमध्ये तिकीट वाटपवरून पक्षांतर्गत मोठा नाराजीनाट्य रंगलय. जवळपास 20-25 कार्यकर्त्यांनी अपक्ष आणि इतर पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलेत. परिणामी, आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या कार्यकर्त्यांना अर्ज माघारी घेण्याच्या सूचनाभाजपकडूनदेण्यातआल्याआहे. दरम्यानअसंनकेल्यास पक्षशिस्तीनुसार कारवाई केली जाईल, असाइशारा सोलापूर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलाआहे. त्यामुळेआजच्याअखेरच्यादिवशीभाजपकार्यकर्तेनेमकीकायभूमिकाघेतातयाकडे साऱ्यांचेलक्षलागलेआहे.
Shivena NCP : 22 जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एकमेकांपुढे उमेदवार
दुसरीकडे, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेतील एकूण 102 जागापैकी 51-51 जागा दोन्ही पक्ष लढतील, असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसनेने 62 तर राष्ट्रवादीने 54 ठिकाणी उमेदवार दिलेत. यामुळे जवळपास 22 जागावर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार युती असताना देखील एकमेकांच्या समोर उभे आहेत. आज महापालिका निवडणुकीत अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते या 22 जागाचा तिढा सोडवण्यासाठी एकत्रित बसणार आहेत. जर तोडगा निघाला नाही तर या जागावर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
Solapur Municipal Corporation Election 2026 : सोलापूर पक्षनिहाय उमेदवार
(एकूण जागा - 102)
भाजप - 102
शिवसेना - 62
राष्ट्रवादी - 56
काँग्रेस - 48
राष्ट्रवादी (शप) - 12
शिवसेना उबाठा - 21
एमआयएम - 23
माकप - 7
मनसे - 3
वंचित - 21
आप - 12
समाजवादी - 4
बसपा - 14
RPI - 4
रासप - 3
आणखी वाचा
