मुंबई : नऊ पैकी सहा खासदारांनी साथ सोडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. या खासदार फुटीनंतर आता एकनाथ शिंदेंचा डोळा ठाकरेंच्या आमदारांवर आणि नगरसेवकांवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला विधानसभेच्या 20 पैकी 16 आमदारांनी उपस्थिती लावली. तर विधान परिषदेचे पाच आमदारही उपस्थित होते.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून त्या निमित्ताने आपल्या आमदारांची भूमिका काय असावी याचं नियोजन प्रत्येक पक्षाकडून केलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही आमदारांची बैठक बोलावली. मात्र 20 पैकी 16 आमदार उपस्थित राहिले असून इतर चार आमदार वेगवेगळ्या कारणांमुळे अनुपस्थित राहिले.
बैठकीला उपस्थित असलेले आमदार
1. बाळा नर 2. नितीन देशमुख 3. सुनील राऊत 4. अजय चौधरी 5. प्रवीण स्वामी 6. गजानन लवटे 7. हारून खान 8. आदित्य ठाकरे9. कैलास पाटील10. सुनील प्रभू11. वरुण सरदेसाई12. भास्कर जाधव13. मनोज जमसुतकर14. बाबाजी काळे15. सिद्धार्थ खरात 16. दिलीप सोपल
विधान परिषद आमदार
1. सचिन अहिर 2. ज मो अभ्यंकर3. अनिल परब4. मिलिंद नार्वेकर 5. अंबादास दानवे
अनुपस्थित असलेले आमदार
1. संजय देरकर- गावी आहेत.2. राहुल पाटील - विधान परिषद निवडणुकीत व्यस्त होते. 3. संजय पोतनीस - 4. सुनील शिंदे - गावी आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत आल्यानंतर या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ते सगळे मिळून वाय बी चव्हाण सेंटरंमध्ये गेले. दरम्यान, ठाकरेंचा सातवा खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असून तो कधीही शिंदेंकडे येऊ शकतो असा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला.
ही बातमी वाचा:
