मुंबई : महापालिका निवडणुकांचे (Election) निकाल लागताच राज्यात पुन्हा विजयी उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली आहे. मुंबईसह (Mumbai) उपनगरातील महापालिकांमध्ये नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न होत असून ठाकरेंचे 4 ते 5 नगरसेवक फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामध्ये, केडीएमसी महापालिकेत 4 आणि मुंबईतील 1 नगरसेविका फुटल्याबाबत वृत्त येत आहे. मात्र, मुंबईतील वार्ड क्रमांक 157 मधील ठाकरेंच्या नगरसेवक सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहेत, त्यांच्या कौटुंबिक कारणास्तव त्या येऊ शकल्या नाहीत. मात्र, त्यांना एक महिन्यांचा अवधी असून त्यांच्यावर कारवाईची कुठलीही वेळ येणार नाही, अशी माहिती शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांनी दिली. 

Continues below advertisement

मुंबईतील नगरसेविका डॅा.सरिता म्हस्के यांच्या फुटीसंदर्भातही अनिल परब यांनी भूमिका मांडली. नगरसेविका सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहेत, त्या कुठेही गेलेल्या नाहीत. त्यांनी त्यांचे कौटुंबिक कारण सांगितले आहे. पुढील 1 महिन्यापर्यंत कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यासाठी  कायदेशीर वेळ आहे. त्यामुळे, डॅा. सरिता म्हस्के यांची नोंदणी होईल. म्हस्के यांनी दिलेले कारण आम्ही कोकण विभागीय आयुक्तांना सांगितले आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. पुढील 1 महिना त्या न आल्यास काय कारवाई करायची याबाबत पक्षश्रेष्ठीच ठरवतील, पण ती वेळ येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबईचा महापौर उद्या कळेल

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर बसेल का? असा प्रश्न शिवसेना नेते तथा आमदार अनिल परब यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, देवाच्या मनात काय आहे हे उद्या सकाळी 11 वाजता कळेल, असे उत्तर परब यांनी दिले. त्यामुळे, मुंबई महापौर पदाबाबत सस्पेंस आणखी वाढल्याचे दिसून येते. महापौर पदाचे आरक्षण जाहीर होवू द्या, उमेदवार ठरू द्या, मग पाहू काय करायचे असेही त्यांनी म्हटले. 

Continues below advertisement

मनसे हा स्वतंत्र पक्ष - परब

कल्याणमध्ये मनसेने घेतलेल्या भूमिकेवर आम्ही बोलणार नाही, तो त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे असे म्हणत केडीएमसी सत्तास्थापनेतील शिवसेना-मनसे एकत्र येण्यावर त्यांनी भूमिका मांडली.

गट नोंदणीला सरिता म्हस्के गैरहजर

मुंबईत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. एकीकडे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये महापौरपदासाठी चढाओढ असताना दोन्ही गटांकडून इतर नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात ठाकरेंच्या एक नगरसेविका शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांची आज बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी सरिता म्हस्के या गैरहजर राहिल्या. तसेच गट नोंदणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक नवी मुंबईला रवाना झाले. त्यावेळीही सरिता म्हस्के गैरहजर राहिल्याने सस्पेन्स वाढला. 

हेही वाचा

केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो