एक्स्प्लोर

Shivsena UBT Candidate Vidhan Parishad Election 2026 मोठी बातमी: अंधारे, विचारे, दानवे, चव्हाण...शिवसेना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी 6 नावांची चर्चा; कुणाला मिळणार संधी?

Shivsena UBT Candidate Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे जाणार की दुसरा उमेदवार देणार?, याकडे महाविकास आघाडीचे लक्ष आहे.

Shiv Sena UBT Candidate Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. (Vidhan Parishad Election 2026)

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जाणार की दुसरा उमेदवार देणार?, ठाकरेंची शिवसेना काय निर्णय घेणार याकडे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) लक्ष आहे. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास फारसे इच्छुक नसले तरी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे विधान परिषदेवर परत यावे, यासाठी आग्रही असल्याचे सूत्रांची माहिती आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत- (Shivsena UBT Vidhan Parishad Election 2026)

विधान परिषद उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील. तर महाविकास आघाडीमध्ये कुठले प्रकारची चर्चा न करता इतर दोन पक्षांकडून उद्धव ठाकरेंच्या नावाला पाठिंबा दिला जाईल. अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यासोबतच काँग्रेस पक्षाकडून मांडण्यात आली आहे. मात्र यामध्ये उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक नसतील, तर मग ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी राज्यसभेप्रमाणे अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. 

ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी कोणाच्या नावाची चर्चा? (Shivsena UBT Vidhan Parishad Election 2026)

ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare), माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), माजी खासदार राजन विचारे (Rajan Vichare), माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik), सचिव सूरज चव्हाण (Suraj Chavan) या पाच ते सहा  नावाची चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतःच विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेतात की आपल्या पक्षातील इतर नेत्याला विधान परिषदेसाठी संधी देतात हे पाहावे लागेल.

विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

  • उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा)
  • नीलम गोऱ्हे (शिवसेना)
  • शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)
  • अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
  • गोपीचंद पडळकर (भाजप)
  • रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
  • राजेश राठोड (काँग्रेस)
  • प्रवीण दटके (भाजप)
  • रमेश कराड (भाजप)

विधान परिषदेची पोटनिवडणूक- (Vidhan Parishad Byelection 2026)

  • प्रज्ञा सातव

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026 
  • उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
  • उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026 
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
  • मतदानाची तारीख: 12 मे 2026
  • मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
  • मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026 

संबंधित बातमी:

Uddhav Thackeray Vidhan Parishad Election 2026: उद्धव ठाकरे विधानपरिषद लढवणार की नाही?; बिनविरोध निवडणुकीचा खेळ ठाकरेंच्या उमेदवारीवर ठरण्याची शक्यता

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
West Bengal : महिलांना 3000 रुपये महिना, बसचा प्रवास मोफत, सातवा वेतन आयोग गठीत; बंगालच्या कॅबिनेटमध्ये धडाधड निर्णय
महिलांना 3000 रुपये महिना, बसचा प्रवास मोफत, सातवा वेतन आयोग गठीत; बंगालच्या कॅबिनेटमध्ये धडाधड निर्णय
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
Mumbai News: BMC मधील 79 नगरसेवकांवर टांगती तलवार, निवडीविरोधात याचिका दाखल, कुणाकुणाची नावं?, यादी समोर
BMC मधील 79 नगरसेवकांवर टांगती तलवार, निवडीविरोधात याचिका दाखल, कुणाकुणाची नावं?, यादी समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
Gold Price: आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
Gold Import: सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
Embed widget