Ratnagiri News : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा मुला संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. विक्रांत जाधव (Vikrant Jadhav) यांनी लोटे MIDCमध्ये (Lote MIDC) दबंगगिरी केल्याच्या प्रकार समोर आला आहे. यात शिंदेच्या युवासेनाच्या उपजिल्हा प्रमुखाला शिवीगाळ करत मारहाण (Crime) केल्याची माहिती आहे. लोटे MIDC मधील कंपनीत बांधकामाच्या ठेक्यावरून दोघात वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान याच वादातून हि शिवीगाळ आणि नंतर मारहाण झाल्याचे बोललं जात आहे.

Continues below advertisement

दरम्यान या प्रकरणी भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांच्यासह अन्य दहा जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या प्रकाराने दोन्ही शिवसेना आपसात भिडल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यात वर्तवली जात आहे.

Vikrant Jadhav : तुमचा मंत्री म्हणून तुम्ही वाट्टेल ते करणार का?

Continues below advertisement

मिळालेला माहिती नुसार, लोटे MIDC मध्ये कामावरून दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपल्याचे यावेळी बघायला मिळालं. तर स्थानिकांना काम देण्यावरून यात दोन गटात जुंपली. दरम्यान हा सर्व प्रकार घडत असताना उद्धव गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांचा शिवीगाळ करत मारहाण करतानाचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला असून तो आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतो आहे.

तर तुमचा मंत्री आहे म्हणून तुम्ही वाट्टेल ते करणार का? असं म्हणत योगेश कदम यांचा कार्यकर्ता असलेल्या सचिन कातेला विक्रांत जाधव यांनी प्रश्न केला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत विक्रांत जाधव यांच्यासह अन्य दहा जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News : विक्रांत जाधव यांच्यासह अन्य दहा जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

खेड, रत्नागिरी - लोटे एमआयडीसीतील मारहाण प्रकरणात विक्रांत जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जाधव यांच्यासह आणखी दोन जण शिवाय सात ते आठ अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारतीय न्यायसंहिता 189(1), 189( 2 ), 190, 191 (2) 115 (2) 352, 351 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा