एक्स्प्लोर

ठाकरेंचे खासदार फुटले, गटही स्थापन झाला; आता प्रतीक्षा 19 जूनच्या ऐतिहासिक वर्धापन दिनाची!

Operation Tiger UBT Shivsena: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

दिल्ली : शिवसेना ठाकरे गटांचे सहा खासदार अखेर शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार हे निश्चित झालं आहे. सहा फुटीर खासदारांचा गट देखील स्थापन झाल्याची माहिती आहे. गटस्थापनेनंतर शिवसेनेत हे सर्व सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत (Operation Tiger UBT Shivsena) जाणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गेल्या दोन दिवसापासून ऑपरेशन टायगरची (Operation Tiger UBT Shivsena) चर्चा होती, ते आता सक्सेसफुल झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार (Operation Tiger UBT Shivsena) आता शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. या खासदारांनी गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे, या गटस्थापनेनंतर आता ते शिवसेनेत विलीन होणार आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर देखील गटाची स्थापना झाली आणि विलीनीकरण होणार हे निश्चित झालं आहे.(Operation Tiger UBT Shivsena)

तर सूत्रांच्या माहितीनुसार सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यांच्या सह्यांचा पत्र गट स्थापननेसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे देण्यात आले आहे, त्यानंतर आता गट स्थापन झाल्याची माहिती मिळते आहे, या सगळ्या नंतर आता सहा जणांचा गट शिवसेनेत विलीन होणार आहे. ही प्रक्रिया लवकरच पार पडणार असल्याची माहिती मिळते आहे, आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत देखील घेतली, यावेळी वाजे, अरविंद सावंत आणि देसाई हे तीन खासदार उपस्थित होते आणि जे सहा खासदार अनुपस्थित होते, यावरून स्पष्ट झालं की, ते सर्व सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत. त्यांनी त्यांचा एक गट ओम बिर्ला यांच्याकडे स्थापन केला आहे, आणि हा गट लवकरच शिवसेनेमध्ये विलीन करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.(Operation Tiger UBT Shivsena)

Operation Tiger UBT Shivsena: लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजूरी दिली

 उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिले. लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजूरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली आहे. त्यानंतर हा गट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत विलीन होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काल रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक-एक करुन दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. काहीवेळापूर्वीच या सहा बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र सादर केले. लोकसभा अध्यक्षांच्यादेखत बंडखोर आमदारांनी पत्रावर सह्या केल्या. त्यामुळे या खासदारांच्या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली. (Maharashtra Politics)

पक्षांतरबंदी कायद्यानुसार, स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आमदार किंवा खासदार संख्येच्या एकूण संख्याबळाच्या दोन तृतीयांश संख्याबळाची गरज असते. ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार आहेत. यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे या गटाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे.

शिवसेनेच्या सहा खासदारांचा गट स्थापन झाला आहे. शांततेत प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे. वर्धापन दिनी खासदार आपली भूमिका स्पष्ट करतील असंही सांगितलं जातंय. त्यामुळे 19 तारखेलाच हे खासदार त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं दिसतंय. आज 17 तारीख आहे, त्यामुळे आपल्याला या खासदारांची भूमिका जाणून घेण्यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागू शकते, कारण या खासरांचा अधिकृत पक्षप्रवेश हा आता 19 तारखेला होणार असल्याची माहिती आहे. जेव्हा शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन सोहळा होतोय. नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा सोहळा पार पडणार आहेत. त्याच सोहळ्यामध्ये मोठ्या शक्ती प्रदर्शनासह हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.

Shivsena UBT MP:  एनडीएच्या बैठकीनंतर ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब 

तर एनडीएच्या बैठकीनंतर ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आलेली आहे. १० जूनला दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमधे ठाकरेंच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. रात्री ११ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला ओमराजे निंबाळकर देखील दिल्लीत उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Shivsena UBT MP:  काय आहे 'ऑपरेशन टायगर'?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर' ही चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ठाकरेंचे हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. 

Shivsena news:  ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

Shivsena UBT MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Nilesh Rane : 'ज्यांनी राणेंचा तिरस्कार केला, ते स्वतःच 'हिट विकेट' झाले', निलेश राणेंचा विनायक राऊतांना जोरदार टोला!
'ज्यांनी राणेंचा तिरस्कार केला, ते स्वतःच 'हिट विकेट' झाले', निलेश राणेंचा विनायक राऊतांना जोरदार टोला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
Embed widget