एक्स्प्लोर

Thane Muncipal Corporation Election 2025: 'अबकी बार 70 पार, महापौर भाजपचाच होणार'; भाजपकडून स्वबळाचा नारा, ठाण्यात महायुतीमध्ये कलगीतुरा

Shivsena vs Bjp Thane Muncipal Corporation Election 2025: ठाणे महानगर पालिकेत महायुतीत कमालीचे विसंवादी सूर निर्माण झाल्याचं दिसतंय. भाजप आणि शिवसेनेने ठाणे महापालिकेत स्वबळाचा नारा दिलाय.

Shivsena vs Bjp Thane Muncipal Corporation Election 2025: ठाणे महानगर पालिकेत (Thane Muncipal Corporation Election 2025) महायुतीत (Mahayuti) कमालीचे विसंवादी सूर निर्माण झाल्याचं दिसतंय. भाजप आणि शिवसेनेने ठाणे महापालिकेत स्वबळाचा नारा दिलाय. स्वबळावर ठाणे मनपा लढवण्याची मागणी शिवसेना नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी केलीय. काल आनंद आश्रम इथे नरेश म्हस्केंच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत भाजपबाबत पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटला. तर आता ठाण्यात पार पडलेल्या भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीतही 'अबकी बार 70 पार', 'महापौर भाजपचाच होणार', असा नारा देण्यात आला. 

ठाणे भाजपाच्या 18 मंडळातून 416 इच्छुकांनी या कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला. या बैठकीत 'अबकी बार 70 पार', 'महापौर भाजपचाच होणार'अशी भूमिका भाजपच्या (Thane Election 2025) उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडली. निवडणूक पुर्व तयारी अभ्यास वर्गाच्या बैठकीत आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले,भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या इच्छुक उमेदवार कार्यशाळेत भाजपची स्वबळाची तयारी सुरु आहे. शिंदेंच्या शिवसेनेनंतर भाजपच्या देखील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. 

गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्येही कोल्डवॉर- (Eknath Shinde vs Ganesh Naik)

शिवसेना करत असलेल्या विकासकामांत भाजप पदाधिकाऱ्यांचे अडथळे येत असल्याची तक्रार करण्यात आलीय. त्यावर खासदार म्हस्केंनी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले अशी माहिती समजतेय. दुसरीकडे ठाण्यात भाजपनेही स्वबळाची तयारी सुरू केलीय. 33 प्रभागातील इच्छुकांसाठी भाजपने शिबीर आयोजित केलं आहे. भाजप 33 प्रभागातील उमेदवारांची चाचपणी करणार आहे. त्याचसोबत काही दिवसांपूर्वी भाजपचा महापौर करण्याचं वक्तव्य आमदार संजय केळकरांनी केलं होतं. तसंच भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्येही कोल्डवॉर सुरू आहे. 

ठाणेकर अम्हालाच साथ देतील- संजय केळकर (Shivsena Shinde Group vs BJP Thane)

एकटे लढलो तर आमचा महापौर बसावा अशी इच्छा आहे आणि ठाणेकर अम्हालाच साथ देतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तसेच प्रशासकीय अधिकारी भ्रष्टाचार करतात, निर्धावतात कारण त्यांच्या मागे नक्कीच कोणीतरी असते, कोणाच्या पाठिंबा असल्याशिवाय ते भ्रष्टाचार करणार नाहीत, अशी संजय केळकर यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली आहे. 

महायुतीत स्वबळाचे नारे, VIDEO:

संबंधित बातमी:

Thane Municipal Corporation: भाजपच्या तयारीनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा ठाण्यात स्वबळाचा शड्डू ठोकला! रात्रीच्या बैठकीत काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast : 'दिल्ली स्फोटात जैशचा हात? डॉक्टर उमर मोहम्मद ताब्यात
Delhi Blast: 'ब्लास्ट इतना जबरदस्त था की मंदिर के झूमर तक सारे हे गये', प्रत्यक्षदर्शीचा दावा
Delhi Blast After Visual: दिल्लीत भीषण स्फोटानंतर चांदणी चौकात काय झालं?
Ratnagiri Alert Mode: दिल्ली स्फोटानंतर कोकण अलर्टवर, रत्नागिरी बंदरांवर कडक तपासणी
Delhi Blast Umar Car: स्फोटातील कार आमची नाही, उमरच्या परिवाराचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
BMC Election Reservation: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महिलांसाठी 114 वॉर्ड राखीव; SC, ST साठी कोणते वॉर्ड आरक्षित?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या वॉर्डात आरक्षण? यादी जाहीर, तुमच्या वॉर्डात काय झालं?
Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोटासाठी खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमोनिअम नायट्रेटचा वापर, गाडी लाल सिग्नल दिसताच थांबली अन् धडाम्....
दिल्ली स्फोटासाठी खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमोनिअम नायट्रेटचा वापर, गाडी लाल सिग्नल दिसताच थांबली अन् धडाम्....
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Embed widget