रत्नागिरी : राज्यात महापालिका निवडणुकानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही (Election) निकाल लागला असून महायुतीमधील अंतर्गत वाद समोर येत आहेत. साताऱ्यात भाजपला सोडून सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सांगलीतील सत्तास्थापनेवरुन मंत्री शंभूराज देसाईंनी भाजपवर जोरदार टीक केली होती. एका लुगड्याने कोणी म्हातारी होत नाही, असे म्हणत भाजप सोयीस्करपणे भूमिका स्वीकारत असल्याचे देसाई यांनी म्हटले होते. आता, शंभूराज देसाईंच्या टीकेला भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्त्युत्तर दिलंय. तसेच, महापालिका निकालानंतरची वस्तूस्थितीही सांगितली. 

Continues below advertisement

शंभूराजे देसाई माझे चांगले मित्र आहेत, सांगली महापालिकेत यापूर्वी भाजपचे जास्त संख्याबल होते, शिवसेनेचा एकही नव्हता. शिवसेनेची ताकद वाढली म्हणून आम्ही युती केली. शिवसेनेने दिलेल्या उमेदवारांमुळे भाजपचे काही उमेदवार पडले आहेत. तुमच्या मतं खाण्यामुळे भाजपचे उमेदवार पडले, असे म्हणत शंभूराज देसाईंनी भाजपवर केलेल्या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिले. अजित दादांच्या नगरसेवकांकडून पाठिंबा देण्याबाबत मला निरोप आला. आम्ही ते 16 घ्यायचे का तुमचे दोन घ्यायचे? आम्ही 16 ला हो म्हटलं. तुमच्यामध्ये आमचे दोन गेले, त्याला आम्ही काय करायचे? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. कुणीतरी कुणालातरी फसवलेले आहे, आमच्यामुळे तुम्ही मंत्री झाला असं तुम्ही बोलता. पण आम्ही काहीतरी वेगळं बोलू, सांगालीमध्ये 39 आणि 16 संख्या झाल्यामुळे उपमहापौरपद दिले, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते, शंभूराज देसाई

निवडणुकीच्या अगोदर मित्र पक्षांना डावलायचं आणि नंतर सत्ता स्थापन करताना सोबत असल्याचे सांगायचं ही भाजपची सोयस्कर भूमिका नेहमी असते. शिवसेनेची भूमिका ठरवणारे भाजप कोण ? जिल्हा परिषदेमध्ये पाठिंबा द्यायचा किंवा नाही याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश येतील त्या पद्धतीने आमचा पुढील निर्णय असणार आहे, अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील सत्तास्थापनेवर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सांगलीमध्ये ते प्रसारमध्यमांशी बोलत होते.

Continues below advertisement

समोर माईक दिसला की स्फूरण चढते

रोहित पवार यांच्याकडून दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. त्यावरुन चंद्रकांत पाटील म्हणाले की, या देशांमध्ये कोणाला काहीही बोलण्याची मुभा आहे. कुणाला काहीही संशय व्यक्त करायला मुभा आहे. रोहित पवार यांनी माध्यमांसमोर बोलून काहीही उपयोग नाही, त्यांनी मुळापर्यंत गेले पाहिजे. समोर माईक दिसले की आपल्याला स्फुरण चढते, मी रोहित पवार यांना दोष देत नाही. त्यांनी एजन्सीकडे कंप्लेंट करावी, त्यांनी मुळापर्यत गेले पाहिजे, असा सल्ला चंद्रकांत पाटील यानी रोहित पवारांना दिला. तसेच, अजितदादा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पत्रकारांनी आणि कुणीही पडू नये, त्यांचं त्यांना करू द्यावे, असेही पाटील यांनी म्हटले.  

हेही वाचा

राष्ट्रवादी एकत्रीकरणाचे पहिले पाऊल जुन्नरमध्ये, अतुल बेनके आणि अमोल कोल्हेंचा एकत्र पुढे जाण्याचा निर्णय