Shivsena Opration Tiger Eknath Shinde Uddhav Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 2022 मध्ये तब्बल 40 आमदारांना सोबत घेत अखंड शिवसेनेत ऐतिहासिक बंड केलं. यानंतर 4 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले आहेत. या 6 खासदारांनी वेगळा गटही स्थापन केला आहे आणि तसं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
ऑपरेशन टायगर (Shivsena Opration Tiger) फुलप्रूफ झालेले असून आता लगेच काहीही जाहीर करायचे नाही, कोणतेही पुरावे द्यायचे नाही असं शिंदे शिवसेनेकडून ठरवण्यात आल्याचं कळतंय. ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पावलं टाकली जातील. पुढील 2 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी माझाला दिली आहे. अतिशय काटेकोरपणे आणि नियोजन पद्धतीनं ऑपरेशन टायगर राबवलं गेल्याची माहिती हळूहळू समोर येत आहे. रात्रभरात दिल्लीत वायूवेगानं घडामोडी घडत गेल्या. दरम्यान खासदारांचा स्वतंत्र गट लवकरच शिवसेनेत विलीन करण्यात येणार असून शिंदेंचे 6 खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करुन आपली बाजू मांडतील, असं सांगण्यात येत आहे. याचदरम्यान ऑपरेशन टायगरबाबत एक महत्वाची घडमोडी समोर आली आहे.
6 खासदारांना कॉन्सफरन्स कॉलवर घेतलं, एकनाथ शिंदेंनी कोणतं आश्वासन दिलं? (Eknath Shinde Shivsena Opration Tiger)
शिवसेनेच्या सर्व सहा खासदारांचा रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्यासोबत कॉन्फरन्स कॉलवर बोलणं झाल्याची सूत्रांची माहीती आहे. एकनाथ शिंदेंनी सर्व सहा खासदारांसोबत 30 मिनिटं सविस्तर चर्चा केली. संभ्रम असलेले उबाठाचे दोन खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटीलही कॉनकॉलमधे असल्याची सूत्रांची माहिती आहे. ऑपरेशन टायगर यशस्वीरित्या पार पडलंय, शिवसेना सर्व खासदरांच्या पाठिशी खंभीर उभी राहणार, असं एनकाथ शिंदेंकडून यावेळी आश्वासन देण्यात आलं. त्यामुळे ठाकरेंचे सहा खासदार आज संसदीय बोर्डाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची शिवसेना सूत्रांची माहीती आहे. हे सर्व ऑपरेशन गोपनिय पद्धतीने राबवण्याची दिल्लीत श्रीकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी श्रीकांत शिंदे दिल्लीत ठाण मांडून आहेत.
ठाकरेंकडून खासदारांची मनधरणी करण्यासाठी संपर्क- (Shivsena Opration Tiger)
फुटणाऱ्या खासदारांचा संशय असणाऱ्या खासदारांची मनधरणी करण्यासाठी आणि संपर्क साधण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे. ज्या खासदारांच्या नावाची चर्चा सुरु झाल्यापासून संबंधित खासदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये मराठवाड्यातील खासदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. मंगळवारी रात्रीपर्यत मराठवाड्यातील खासदारांचा संपर्क अंबादास दानवे यांच्याशी झाला. मात्र कालच्या दिवसात कोणत्याच नेत्यांकडून खासदारांशी संपर्क झाला नसल्याची माहिती मिळत आहे. तर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांना आमदार सचिन अहिर आणि माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्याकडून वारंवार संपर्क केला जात आहे. संपर्क साधत असलेले नेते थेट उद्धव ठाकरेंना संपूर्ण माहिती देत असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.
ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे- (Shivsena MP List)
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
कोणते खासदार शिंदे गटात गेले? (Opration Tiger Shivsena MP)
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
