Shivsena Operation Tiger:महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले असून ते आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे. राज्यातील या घडामोडींच्या पार्श्वभूमीर, 19 जून रोजी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये (Nesco Center) शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचा 60 वा वर्धापन दिन अत्यंत भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. 

Continues below advertisement

Shivsena Operation Tiger:  ठाकरेंचा व्हिप नाकारला

शिवसेना ठाकरे गटाकडून खासदारांच्या एकनिष्ठतेची 'लिटमस टेस्ट' घेण्यासाठी दिल्लीत संसदीय पक्षाची (Parliamentary Party Meeting) बैठक बोलावण्यात आली होती. पक्षाने सर्व खासदारांना 'व्हीप' देखील जारी केला होता. मात्र, 9 पैकी 6 खासदारांनी या बैठकीला दांडी मारली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या 30 मिनिटांच्या 'कॉन्फरन्स कॉल' नंतर या खासदारांचे 'मनपरिवर्तन' रोखण्यासाठी त्यांना जयपूरला पाठवण्यात आले होते. 

Shivsena Operation Tiger: बंडखोर खासदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी दिलेल्या इशाऱ्यांनंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानासह सर्व 6 बंडखोर खासदारांच्या घराबाहेर स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Continues below advertisement

Shivsena Operation Tiger: ठाकरे गट लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेणार

'व्हीप'चे उल्लंघन केल्यामुळे ठाकरे गट आता कमालीचा आक्रमक झाला असून, अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांवर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कडक कारवाई करून त्यांना अपात्र करण्यात यावे, यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अधिकृत पत्र लिहिणार आहे. मात्र, बंडखोर खासदारांकडे दोन-तृतीयांश म्हणजेच आवश्यक ते बहुमत असल्यामुळे कायदेशीर लढाईत शिंदे गटच वरचढ ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Anant Kalse on Shivsena Operation Tiger: व्हीप बजावूनही सहा खासदारांची बैठकीला दांडी, आता ठाकरे गटासमोर कोणते पर्याय? विधिमंडळाच्या माजी सचिवांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...