Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 2022 मध्ये ऐतिहासिक बंड करत अखंड शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदार फोडले. यानंतर ठाकरे सेना आणि शिंदेंची शिवसेना यामध्ये पक्षाचं नाव आणि चिन्हावरुन जोरदार वाद (Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court) सुरु आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात काल (30 जुलै) पुन्हा सुनावणी पार पडली. ठाकरे सेनेच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपील सिब्बल (Kapil Sibal) यांनी युक्तिवाद केला. 2018 मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांचे पुरावे सादर करण्यात आल्याचं सिब्बल यांनी निदर्शनास आणलं. तसंच उद्धव ठाकरेंनीच (Uddhav Thackeray) 2018 मध्ये एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी नियुक्ती केल्याचंही सिब्बल यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी आता 4 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.

Continues below advertisement

बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात आहे. 1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेचे 2013 पासून उद्धव ठाकरे हेच अधिकृत पक्षप्रमुख होते. 2018 मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांचे पुरावे यावेळी कोर्टात सादर करण्यात आले. एकनाथ शिंदे यांची 2018 मध्ये गटनेतेपदी नियुक्ती खुद्द उद्धव ठाकरे यांनीच केली होती, असं सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.  सुभाष देसाई प्रकरणाचा दाखला देत त्यांनी स्पष्ट केले की, केवळ आमदारांचे संख्याबळ जास्त आहे म्हणून विधिमंडळ पक्षाला मूळ राजकीय पक्ष मानता येत नाही, असा युक्तिवादही कपील सिब्बल यांनी कोर्टात केला. तसेच या याचिकेवर वेळेवर सुनावणी झाली असती तर शिंदे सरकार स्थापन झाले नसते, असा युक्तिवादही कपील सिब्बल यांनी केला. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)

कोर्टात काय काय घडलं? (Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court)

  • उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपील सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद
  • कपील सिब्बल यांनी मुंबईपासून आसामपर्यंतचा सर्व घटनाक्रम सांगितला.
  • कपील सिब्बल - निघून गेलेल्या आमदारांनी एक ठराव केला. अध्यक्षांना पाठवला. अध्यक्षांनी राज्यपालांना मार्क केले. राज्यपालांनी बहुमत चाचणीची मागणी केली 
  • हे सर्व फक्त आमदार आहेत , ते राजकीय पक्ष नाहीत.
  • जर याप्रकरणी सुनावणी झाली असती तर हे सरकार स्थापन झालं नसतं. 
  • कोणीतरी एका चिन्हावर निवडून येते, दुसऱ्या पक्षात जातात. 
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रं हाती घेतली आणि पक्ष वाढविला.
  • 2018 मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढलेली निवडणूक जिंकली आणि 2019 मध्ये मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सदस्य म्हणून मंत्री झाले.
  • विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग झाले. 
  • यानंतर 31 आमदार अचानक गुवाहाटीला रवाना झाले.
  • कपील सिब्बल यांनी पश्चिम बंगाल आणि इतर प्रकरणांचा संदर्भ दिला.
  • न्यायालयाने यावर निर्णय घेतले पाहिजे
  • सरन्यायाधीश- सुनावणीदरम्यान तुम्ही पण अनेकदा वेळ वाढवून मागितली होती. 
  • सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे न्यायालयाचे निर्देश 
  • पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल, न्यायालयाचे स्पष्टीकरण...

Continues below advertisement

संबंधित बातमी:

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद