Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज दुपारी 2 वाजता पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी (Shivsena Name And Symbol Hearing) होणार आहे. सोमवारी सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची भूमिका, लोकप्रतिनिधी कायदा आणि पक्षाच्या घटनेवरून आयोगाच्या अधिकारांवर जोरदार हल्ला चढवला. आज पुन्हा सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. दरम्यान, काल सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाबाहेर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार ड्रामा पाहायला मिळाला.
शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के आणि शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत, अनिल देसाई माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यात माध्यमांशी बोलण्याआधी बाहेर जोरदार ड्रामा झाला. नरेश म्हस्के आणि संजय राऊत एकमेकांना काहीतरी बोलत होते. यानंतर ठाकरे गटाचे अनिल देसाई नरेश म्हस्के यांच्या दिशेने धावत गेल्याचं व्हिडीओमधून दिसून येत आहे. यावेळी नेमकं काय घडलं, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court)
नेमकं काय घडलं? (Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court)
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अनिल देसाई आणि शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के समोरासमोर आले. त्यावेळी सहकाऱ्यांमधील संवादादरम्यान अनिल देसाई हे नरेश म्हस्के यांच्या दिशेने वेगाने धावत गेल्याचे पाहायला मिळाले, ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या कायदेशीर सुनावणीनंतर हा प्रसंग घडला. कोर्टाच्या बाहेर दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये शाब्दिक व लक्षवेधक प्रसंग पाहायला मिळाला.अनिल देसाई अचानक नरेश म्हस्केंच्या दिशेने गेल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत यांनी नरेश म्हस्के यांना आमनेसामने चर्चा करण्याचे आव्हान दिले मात्र, म्हस्के यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर राऊत यांनी त्यांच्यासोबत असलेल्या अनिल देसाई यांना म्हस्के यांना घेऊन येण्यास सांगितले. मात्र म्हस्के निघून गेले. यानंतर अनिल देसाई हे नरेश म्हस्के यांच्या दिशेने गेले. मात्र, म्हस्के तेथून निघून गेले. त्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यांकडे पाहत, "अरे ये ना, यावच लागणार आहे ना", अशा शब्दांत म्हस्के यांना पुन्हा आवाज दिला. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सुप्रीम कोर्टात काल झालेल्या सुनावणीत काय काय घडलं? (Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court)
काल झालेल्या सुनावणीत आमदारांमध्ये किंवा विधिमंडळ पक्षात पडलेली फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही, असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडणारे अॅड. कपिल सिब्बल यांनी केला. निवडणूक आयोगाने असं करून आपल्या अधिकारक्षेत्राचा गैरवापर केल्याचं सिब्बलांनी म्हटलं. 2018 मध्ये पक्ष घटनेत झालेले बदल लोकशाहीविरोधी असल्याचा दावा एकनाथ शिंदेंचा गट करत असेल तर त्याच घटनाबदलानुसार शिंदेंची नियुक्ती झाली होती हे ते विसरतात असं सिब्बलांनी म्हटलंय. याचाच अर्थ असा की शिंदेंची नियुक्तीही लोकशाहीविरोधीच ठरते असं सिब्बल म्हणाले.
1999 च्या मूळ घटनेत मुख्य नेता हे पदच नव्हतं- सिब्बल (Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court)
1999 च्या मूळ घटनेत मुख्य नेता हे पदच नव्हतं, मग हे पदच नसेल तर शिंदे या पदावर कसे असा सवाल सिब्बल यांनी केला. सिब्बल यांनी सलग तिसऱ्या दिवशी युक्तिवाद केलाय. आता या प्रकरणाची आज पुन्हा सुनावणी होणार आहे आज सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
