Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court Final Date:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 2022 मध्ये ऐतिहासिक बंड करत अखंड शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदार फोडले. यानंतर ठाकरे सेना आणि शिंदेंची शिवसेना यामध्ये पक्षाचं नाव आणि चिन्हावरुन जोरदार वाद (Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court) सुरु आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची अंतिम सुनावणी सुरु आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी याच महिन्यात पूर्ण होणार असल्याचं समोर आलं आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस निकाल अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. सुप्रीम कोर्टाने आज एका सुनावणी दरम्यान ॲाक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेना चिन्ह आणि पक्ष प्रकरण संपणार असं तोंडी सांगितले. निवडणूक आयोगाची बाजू पुढील आठवड्यात मांडली जाईल. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचे रिजॅाईंडर तिसऱ्या आठवड्यात होईल.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या फायनल निकालाची तारीख ठरली- (Shivsena Name And Symbol Hearing)

आज सुप्रीम कोर्टात पश्चिम बंगाल एसआयआरची सुनावणी त्वरीत घ्यावी अशी विनंती वकीलांतर्फं करण्यात आली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितले की 30 ॲाक्टोबरपर्यंत शिवसेनेची सुनावणी संपवायची आहे. त्यानंतर बंगालमधील एसआयआरचे प्रकरण घेतले जाईल. त्यामुळे 30 ॲाक्टोबरपर्यंत म्हणजेच दिवाळीआधी शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळाणार, याबाबत समोर येणार आहे. 

Continues below advertisement

शिवसेना कुणाची?, कालच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टात काय घडलं? (Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court)

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत काल (8 ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीदरम्यान वकील नीरज किशन कौल यांनी निवडणूक आयोगाची निरीक्षणे आणि पक्षांतर्गत लोकशाहीवर भाष्य केलं. नीरज किशन कौल सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करताना म्हणाले की, सुनावणीदरम्यान कौल म्हणाले की, 1998 साली शिवसेनेला पत्राद्वारे कळवण्यात आले होते की पक्षातील नेमणुका या लोकशाहीच्या तत्त्वांना धरून नाहीत, ज्यावर शिवसेनेने आपले उत्तरही दिले होते. आयोगाने प्रत्येक पक्षाने आपली कार्यपद्धती ठरवून ती घटनेत नमूद करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच 2010 च्या नियमांनुसार, पक्षघटनेतील कोणताही बदल हा पक्षाच्या जनरल बॉडीकडून मान्य होणे बंधनकारक होते. पक्षात पडलेल्या फुटीबाबत आयोगाने नोंदवलेल्या निरीक्षणाचा दाखला देत कौल म्हणाले की, शिवसेनेची कार्यपद्धती आणि नेमणुकांची पद्धत यातून पक्षांतर्गत लोकशाहीला धक्का बसत होता. तत्कालीन पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार देण्यात आले होते; पक्षप्रमुख आणि पक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्या होत्या, ज्यांना वेगळे करणे अशक्य होते. 2018 च्या पक्षघटनेनुसार सर्व पदाधिकारी नेमण्याचे अधिकारही थेट पक्षप्रमुखांनाच मिळत होते.

संबंधित बातमी:

शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?