Sanjay Gaikwad बुलढाणा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या आज (31 जानेवारी) राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. (Maharashtra First Women DCM Of Maharashtra) दरम्यानया शपथविधीबाबतराजकीयवर्तुळातूनप्रतिक्रियासमोरयेतआहे. अशातच शिसेनेचेबुलढाण्याचेआमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हेयावरबोलतानाम्हणालेकि, अजित दादांची राख अद्यापही शांत झालेली नाही. मात्र इतक्या लवकर या घडामोडी होतील असं वाटलं नाही. अशीप्रतिक्रियादेतत्यांनीया शपथविधीवरभाष्यकेलं.

दरम्यान, हा पवार कुटुंबियांचा एकत्रित निर्णय असेल. गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर दादांचीही मानसिकता हीच होती की दोन्ही पक्ष एकत्र येऊन निर्णय घ्यावे. दोन्ही कुटुंबांनी मिळून हा निर्णय घ्यायचा आहे. त्यांच्या मागे भीष्मपितामह म्हणून पवार साहेब (Sharad Pawar NCP) उभे आहेत. तर अजित पवारांच्या निधनामागे कुठलाही घातपात नसून हा केवळ, केवळ आणि केवळ अपघात आहे. असेहीतेम्हणाले.

Sanjay Gaikwad on Sanjay Raut : संजय राऊत यांच्या वक्तव्याशी मी सहमत

दरम्यान, या विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, सर्वांनी मागणी केली आहे मीही करतो. असेहीआमदार संजय गायकवाड म्हणाले.तरअजित दादांच्या चारित्र्याला कलंक लागेल अशा गोष्टी आता थांबल्या पाहिजेत. संजय राऊत यांच्या वक्तव्याशी मी सहमत असून हे माझं वैयक्तिक मत आहे. असेहीआमदार संजय गायकवाड म्हणाले. सिंचन घोटाळ्यातील आरोप आता मागे घेतले पाहिजे का? याबाबतआमदार गायकवाड यांनाप्रश्नकेलाअसतातत्यांनीयावरप्रतिक्रियादिली.

शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला दुर ठेवण्यात आल्याचं चित्र (NCP Sunetra Pawar)

 सुनेत्रा पवारांचा आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी (Sunetra Pawar Oath) होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. मात्र या शपथविधी सोहळ्यापासुन शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुर ठेवण्यात आल्याचं चित्र आहे. सदर शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं आहे. दरम्यान आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल.