Vijay Shivtare Pune : पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष (Pune Zilla Parishad President) हा शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल, सत्तेची चावी ना अजित पवारांकडे (Ajit Pawar) असेल ना भाजपकडे(BJP), असंमोठंवक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेतेआणिमाजी आमदार विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) केलंआहे. भोरमध्ये झेडपी पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना उमेदवारांच्या प्रचार शुभारंभावेळी आयोजित सभेमध्ये बोलताना विजय शिवतारे यांनीहे विधान केलंय.

Continues below advertisement

Vijay Shivtare : एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय पूर्ण ताकदीने आपण उतारायचंय

आम्ही प्लॅन केलाअसून एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय पूर्ण ताकदीने आपण उतारायचंय. आमचे 13 सीटिंग उमेदवार आहेत. तर 21 रनरप आहेत. 25 ते 30 सीट शिवसेनेचे येणार. पूर्ण पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी चंग बांधलेला आहे. असही शिवतारे म्हणालेत. भोरमधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते भोरमधील मोहरी येथील अमृतेश्वर मंदिरातून करण्यात आला. प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर शिवतारे यांनी सभा घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलंय. यावेळीतेबोलतहोते. यावेळी बोलताना भोरमधील शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत, त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Continues below advertisement

Pune Mayor: पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड कधी? समोरआलीमोठीडे

येत्या सहा फेब्रुवारीला पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे. पुण्याचा महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी सहा फेब्रुवारीला विशेष सभेच आयोजन करण्यात आलंय. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार ही सभा घेण्यात येणार आहे. सहा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता होणाऱ्या पालिकेच्या या सर्वसाधारण सभेत महापौर आणि उपमहापौरपदाची निवड करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या १६५ जागांपैकी ११९ जागी भाजपचे नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार उभे केले जातात की या निवडी बिनविरोध होतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

Indapur : इंदापूरमध्ये आजी-माजी मंत्र्यांनी झिंगाट गाण्यावर धरला ठेका

इंदापूरमध्ये आजी-माजी मंत्र्यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला. इंदापूरमध्ये इंद्रेश्वर मॅरेथॉन सिझन एक ही स्पर्धा पार पडली आहे. इंदापूर स्पोर्ट अँड हेल्थ फाउंडेशन च्या वतीने या मॅरेथॉनच आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील या सोबतच इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा यांसह विविध दिग्गज मान्यवर सहभागी झाले होते. ही भव्य मॅरेथॉन पार पडल्यानंतर दत्ता भरणे हर्षवर्धन पाटील यांसह विविध राजकीय मान्यवरांनी झिंग झिंग झिंगाट या गाण्यावरती चांगलाच ठेकाही धरला. दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर या अंतरात ही मॅरेथॉन पार पडली असून यात इंदापुरातील शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते.