Shiv Sena UBT on Nitesh Rane: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते व मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. “कमळ किंवा धनुष्यबाण चिन्ह दिसलं की लगेच निधी देतो, पण चुकून मशाल चिन्ह निघालं तर असलेला निधीही कमी करतो,” असे विधान नितेश राणे यांनी कणकवलीतील फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) नितेश राणेंवर (Nitesh Rane) जोरदार हल्लाबोल केला आहे.
ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत थेट शब्दांत राणेंवर टीका केली आहे. अखिल चित्रे यांनी लिहिले आहे की, “अरे टिल्लू, सरकारी तिजोरीतला पैसा जनतेचा आहे. सरकारी तिजोरी स्वतःची piggy बँक नाही. सरकारी निधी हा सार्वजनिक पैसा आहे. तो पक्ष, चिन्ह किंवा राजकीय निष्ठेनुसार वाटता येत नाही हे टिल्लू-लेव्हल बुद्धी असणाऱ्याला कसं कळणार? असे म्हणत त्यांनी नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला.
Shiv Sena UBT on Nitesh Rane: असं वागणं म्हणजे लोकप्रतिनिधींच्या शपथेचा भंग
अखिल चित्रे पुढे म्हणाले की, “आमचं चिन्ह, तर पैसा; नाहीतर शिक्षा” हा कारभार लोकशाहीचा नसून सत्तेच्या दडपशाहीचा भेदभावाचा कबुलीजबाब देणारा आहे. मंत्री शपथ घेतो की तो संविधानानुसार काम करेल, कोणताही पक्षपात करणार नाही. पण, असं वागणं म्हणजे लोकप्रतिनिधींच्या शपथेचा भंग आणि मंत्रीपदाचा गैरवापर ठरतो. ह्या घटनाविरोधी, लोकशाहीविरोधी, कायदेशीर दृष्ट्याअयोग्य वागणाऱ्या सत्तेचा गैरवापर करून सरकारी निधीसाठी ब्लॅकमेलींग आणि सौदेबाजी करणाऱ्या ‘टिल्लू बुद्धी’च्या मंत्र्यावर राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री महोदय आपण कारवाई करणार की आपली लोकप्रतिनिधींच्या शपथेचा भंग, मंत्रीपदाचा उघड गैरवापर, निधीचा राजकीय सौदा करणाऱ्याला लोकशाहीला धमकावणाऱ्याला मुक संमती आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
आणखी वाचा
