Sharad Koli : बोगस मतदान, मतपेटीचा घोळ झाला तर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हातपाय...; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
Sharad Koli: निवडणुकीवेळी बोगस मतदान किंवा मतपेटीचा घोळ झाला तर संबंधित बूथवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हातपाय तोडणार, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी (Sharad koli) केलंय.

Sharad Koli सोलापूर : निवडणुकीवेळी बोगस मतदान किंवा मतपेटीचा घोळ झाला तर संबंधित बूथवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हातपाय तोडणार, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी (Sharad koli) केलंय. निवडणूक आयोगाने तात्काळ उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या मागण्या मान्य कराव्यात. भाजप केवळ मतदार याद्यांचा घोळ करूनच सत्तेत येत आहे, पण जो मतदान करण्यासाठी बोगस मतदार येईल त्याचे देखील आम्ही हात पाय तोडू, जो मतदान करून घेईन त्या अधिकाऱ्याचे देखील आम्ही हात पाय तोडू असे वादग्रस्त विधान शरद कोळी यांनी केले आहे.
Hasan Mushrif on Voter List: सदोष मतदार याद्यांवरुन निवडणुका नकोत, मुश्रीफांचा घरचा आहेर
दुसरीकडे, सदोष मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी विरोधी महाविकास आघाडीच्या (MVA) भूमिकेला पाठिंबा दिला आहे. 'सदोष मतदार याद्यांवरती निवडणुका नकोत', असे स्पष्ट मत व्यक्त करत मुश्रीफ यांनी खळबळ उडवून दिली आहे. विरोधी पक्षांनी मुंबईत काढलेल्या मोर्चाला प्रतिसाद देताना, सदोष याद्यांवर निवडणुका घेण्यास आपल्या पक्षाचा आणि युतीचाही आक्षेप असल्याचे ते म्हणाले. देशाची लोकसंख्या आणि छपाईतील चुकांमुळे मतदार याद्यांमध्ये त्रुटी राहतात, असे नमूद करत त्यांनी या चुका दुरुस्त करण्यास सरकारची हरकत नसल्याचेही स्पष्ट केले. या भूमिकेमुळे अजित पवार (Ajit Pawar) गटाची राष्ट्रवादी काँग्रेसदेखील विरोधकांच्या मागणीशी सहमत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विरोधकांच्या नेमक्या मागण्या काय? (MNS And Mahavikas Aghadi Demands)
1. मतदारयाद्या अद्ययावत करा.
2. मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा.
3. मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा.
4. सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा.
मोर्चात कोण कोण उपस्थित राहणार? पाहा यादी-(Who will be present at the morcha?)
शरद पवार, राष्ट्रवादी(शप)
उद्धव ठाकरे, शिवसेना(उबाठा)
राज ठाकरे, मनसे
विजय वडेट्टीवार,काँग्रेस
बाळासाहेब थोरात,काँग्रेस
सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी(शप)
जितेंद्र आव्हाड,राष्ट्रवादी(शप)
जयंत पाटील,राष्ट्रवादी(शप)
रोहित पवार,राष्ट्रवादी(शप)
शशिकांत शिंदे,राष्ट्रवादी(शप)
आदित्य ठाकरे,शिवसेना(उबाठा)
बाळा नांदगावकर, मनसे
जयंत पाटील, शेकाप
प्रकाश रेड्डी, भाकप
अनिल परब,शिवसेना(उबाठा)
अनिल देसाई, शिवसेना(उबाठा)
अरविंद सावंत, शिवसेना(उबाठा)
राजन विचारे , शिवसेना(उबाठा)
सचिन अहिर , शिवसेना(उबाठा)
अंबादास दानवे, शिवसेना(उबाठा)
सुनील प्रभू, शिवसेना(उबाठा)
सुनील शिंदे, शिवसेना(उबाठा)
अविनाश अभ्यंकर, मनसे
नितीन सरदेसाई, मनसे
संदीप देशपांडे, मनसे
अविनाश जाधव,मनसे
नसीम खान, काँग्रेस
सचिन सावंत, काँग्रेस
अमीन पटेल, काँग्रेस
संबंधित बातमी:


















