Eknath Shinde Shivsena Opration Tiger: शिवसेना शिंदे गटाच्या डिनेर डिप्लोमसीला शिवसेना ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी उपस्थिती लावल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी डिनर आयोजित केले होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर (Nagesh Ashtikar) आणि संजय देशमुख (Sanjay Deshmukh) उपस्थित होते. 

Continues below advertisement

महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला उपस्थिती लावली. त्यामुळे विविध चर्चांना उधाणा आले आहे. मात्र केवळ शुभेच्छा देण्यासाठी आम्ही गेलो होतो, असं स्पष्टीकरण नागेश आष्टीकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलं आहे. 

नागेश आष्टीकर काय म्हणाले? (Shiv Sena UBT MP Nagesh Ashtikar)

शिवसेना शिंदेंचे खासदार आणि केंद्रीय मंत्री  प्रतापराव जाधव यांच्या अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम होता. त्यांनी आम्हाला सभागृहामध्ये विनंती केली होती. त्यामुळे  त्यांना शुभेच्छा देण्यासाठी घरी गेलो होतो. 5-10 मिनिटांसाठी गेलो आणि भेटलो. याचा अर्थ आम्ही वेगळ्या चर्चेला गेलो होतो असं नाही. काही बातम्या नसल्या की ऑपरेशन टायगरची चर्चा होते. पण त्यात तथ्य नाही. मला वाटतं सुख-दुख:त एकमेकांना भेटलं पाहिजे. एकाच सभागृहातील असल्याने या भेटीत काही गैर नाही, असं नागेश आष्टीकर यांनी सांगितले.

Continues below advertisement

आम्ही शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो- नागेश आष्टीकर (Shiv Sena UBT MP Nagesh Ashtikar)

गेल्या काही दिवासांआधी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या संबंधित मोहित कंबोज यांच्या एका पार्टीत सहभागी झाले होते. त्यामुळे तुम्ही देखील शिंदे गटाचे खासदार असणाऱ्या प्रताप जाधव यांच्या पार्टीला हजर राहिले का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मोहित कंबोज यांना आदित्य ठाकरे भेटले याचा आणि आमच्या भेटीचा काही संबंध नाही. आदित्य ठाकरे हे आमचे नेते आहेत. आम्ही प्रतापराव जाधवांच्या घरी गेलो होतो यात दुमत नाही, आम्ही शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, असं नागेश आष्टीकर यांनी सांगितले.

ठाकरे-पवारांचे 6-6 खासदार शिंदेंच्या गळाला? (Eknath Shinde Opration Tiger)

तुतारीचे 6 खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्याची एकनाथ शिंदेची तयारी होती. सध्या शिवसेना शिंदेंकडे 7 खासदार आहेत. जर शरद पवार गटाचे 6 आणि ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंकडे आल्यास एकूण 19 खासदार शिवसेना शिंदे गटाचे होतील. त्यामुळे 19 खासदारांचा संख्याबळावर राज्यातील बार्गेनिंग पॉवर वाढवणं. तसेच 2029 च्या निवडणुकीत किमान 19 जागांवर एकनाथ शिंदे दावा करणार असल्याची रणनीती होती. परंतु भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या या रणनीतीला अद्याप ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाहीय. मागील दिल्ली भेटीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना भेट दिली नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

महाराष्ट्रातील 48 खासदारांची यादी- (Maharashtra All Party MP List 2024)

अनुक्रममतदारसंघविजयी उमेदवारपक्ष
1अहमदनगर Ahmednagarनिलेश लंकेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
2अकोला Akolaअनुप धोत्रेभाजप
3अमरावती Amravatiबळवंत वानखेडेकाँग्रेस
4औरंगाबाद Aurangabadसंदीपान भुमरेशिवसेना
5बारामती Baramatiसुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
6बीड Beedबजरंग सोनवणेभाजप
7भंडारा गोंदिया Bhandara Gondiyaडॉ. प्रशांत पडोळेकाँग्रेस
8भिवंडी Bhiwandiबाळ्या मामा म्हात्रेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
9बुलढाणा Buldhanaप्रतापराव जाधवशिवसेेना
10चंद्रपूर Chandrapurप्रतिभा धानोरकरकाँग्रेस
11धुळे Dhuleसुभाष भामरेभाजप
12दिंडोरी Dindoriभास्कर भगरेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
13गडचिरोली Gadchiroli - Chimurडॉ. नामदेव दासाराम किरसानकाँग्रेस
14हातकलंगणे Hatkanangaleधैर्यशील मानेशिवसेना 
15हिंगोली Hingoliनागेश पाटील आष्टीकरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
16जळगाव Jalgaonस्मिता वाघभाजप
17जालना Jalnaकल्याणराव काळेकाँग्रेस
18कल्याण Kalyanश्रीकांत शिंदेशिवसेेना
19कोल्हापूर Kolhapurछत्रपती शाहू महाराजकाँग्रेस
20लातूर Laturशिवाजीराव काळगे काँग्रेस
21माढा Madhaधर्यशील मोहिते पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
22मावळ Mavalश्रीरंग बारणेशिवसेेना
23Mumbai Northपियुष गोयलभाजप
24Mumbai North Centralवर्षा गायकवाडकाँग्रेस
25Mumbai North Eastसंजय दिना पाटीलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
26Mumbai North Westरवींद्र वायकर शिवसेना
27Mumbai Southअरविंद सावंतशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
28Mumbai South Centralअनिल देसाईशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
29नागपूर Nagpurनितन गडकरीभाजप
30नांदेड Nandedवसंतराव चव्हाणकाँग्रेस
31नंदुरबार Nandurbarगोवाल पाडवीकाँँग्रेस
32नाशिक Nashikराजाभाऊ वाजेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
33उस्मानाबाद Osmanabadओमप्रकाश निंबाळकरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
34पालघर Palgharहेमंत सावराभाजप
35परभणी Parbhaniसंजय जाधवशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
36पुणे Puneमुरलीधर मोहोळभाजप
37रायगड Raigadसुनिल तटकरेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
38रामटेक Ramtekश्यामकुमार बर्वेकाँग्रेस
39रत्नागिरीसिंधुदुर्ग Ratnagiri- Sindhudurgनारायण राणेभाजप
40रावेर Raverरक्षा खडसेभाजप
41सांगली Sangliविशाल पाटीलअपक्ष
42सातारा Sataraउदयनराजे भोसलेभाजप
43शिर्डी Shirdiभाऊसाहेब वाकचौरेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
44शिरुर Shirurअमोल कोल्हेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
45सोलापूर Solapurप्रणिती शिंदेकाँग्रेस
46ठाणे Thaneनरेश म्हस्केशिवसेेना
47वर्धा Wardhaअमर काळेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
48यवतमाळ-वाशिम Yavatmal- Washimसंजय देशमुखशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

संबंधित बातमी:

Maharashtra Politics: 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ का सोडणार?; महत्वाची 5 कारणं आली समोर