मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok kharat) प्रकरणावरुन सध्या राज्यभर राजकीय वातावरण तापलं असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट अशोक खरातचे सीडीआरच बाहेर काढले. त्यानुसार, रुपाली चाकणकर, एकनथ शिंदेंसह अन्य काही नेत्यांचे अशोक खरातशी फोन कॉल्स झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावरुन, अंजली दमानियाच आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत, त्यांना हे सीडीआर कोणी दिले, ते कसे काढले आणि ते काढणे योग्य आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत. त्यातच, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant shinde), शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही सवाल केला होता. त्यावर, दमानिया यांनी संजय राऊतांसह त्यांना चहाचे निमंत्रण दिले होते. आता, हे निमंत्रण शशिकांत शिंदे यांनी स्वीकारलं आहे. 

Continues below advertisement

अंजली दमनिया सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या वेगवेगळी माहिती पुढे कशा आणतात हे मलाही जाणून घ्यायचे आहे. मी त्यांचे चहा-पाण्याचे निमंत्रण स्वीकारणार आहे. त्या विरोधी पक्षाची भूमिका बजावतात, मी त्यांच्याकडे जाणार असून ही माहिती त्या कशी मिळवतात? हे जाणून घेणार आहे, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले. तसेच, विरोधक म्हणून त्याचा आम्हाला फायदाच होईल, असेही त्यांनी सांगितले. 

प्राजक्त तनपुरेंची माघार, शशिकांत शिंदे म्हणाले...

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांनी इच्छा दाखवली नाही, आम्ही 1 वाजेपर्यंत वाट पाहिली, त्यामुळे आम्ही गोविंदराव कोकाटे या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी जाहीर केली.  प्राजक्त तनपुरे भाजपकडे बोलणी करत नव्हते, भाजपच्या नेत्यांनी त्यांना संपर्क साधला. कदाचित त्यांना वाटत असेल की त्यांचा विजय कठीण असेल. ते निवडणुकीला का उभे राहिले नाहीत याबाबत मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी राहुरी विधानसभा निवडणुकीसंदर्भात दिले.

Continues below advertisement

एकनाथ शिंदेंना बदनाम केल्यास उत्तर देऊ

अंजली दमानिया यांना आमचे सांगणे आहे की, अशोक खरात प्रकरणात एकनाथ शिंदेंना बदनाम केल्यास शिवसेना जशास तसे उत्तर देईल. बऱ्याचदा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही अनेक नागरिकांना भेटतो बोलतो. मात्र, याचा अर्थ एकनाथ शिंदे त्यात सहभागी आहेत, असा होत नाही. 

दमानियांची माहिती दुर्लक्षित करण्यासारखी नाही

अंजली दमानियांची पत्रकार परिषद झाली असेल, मी बघितलं नाही. मला पुण्याहून यावं लागतं, गांभीर्य लक्षात आलं असेल, कारण काहीही असेल, पण हा ब्रीच ऑफ प्रायव्हसी आहे. पत्रकारांना गांभीर्य असेल, दमानिया गांभीर्य राखतील अशी अपेक्षा आहे, असे म्हणत सीडीआर प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी भूमिका मांडली. अशोक खरातला 177 कॉल चाकणकर यांनी केले आहेत हा मूळ मुद्दा आहे, 17 कॉल एकनाथ शिंदे आणि 6 इनकमिंग आणि आऊटगोईंग वगैरे आहेत. दमानियांनी काहीही केलं तरी आक्षेप जाणार नाही, माझी अडचण अशी आहे, मी आता दमानियांवर कॉन्सन्स्ट्रेट केलं तर बाकी मुद्दे बाजूला पडतील. दमानियांनी माहिती काढली, पण ती दुर्लक्षित करण्यासारखी नाही, ज्यांचे सीडीआर निघाले ते पण गंभीर आहेत, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंची चौकशी करणार का?

एकनाथ शिंदेंची चौकशी करावी, असं तपास यंत्रणा करणार आहे का? ड्रग्स संदर्भात चौकश्या आहेत, नाही, तपासाला वेग मिळत नाही. हे अघोरी वगैरे राज्याला 5-10 वर्षे मागे नेण्यासारखं आहे. एकनाथ शिंदे यांनी कॉल कशाला आणि का केले? याची चौकशी झाली पाहिजे. दमानिया इतक्या वेळेस म्हणतात मग त्यात तथ्य असेल नसेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. पण, एकनाथ शिंदेंची चौकशी एसआयटी करणार आहे का? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा

नांदेड पुन्हा हादरलं, खुनातील आरोपी अन् पोलिसांत चकमक; अंकुशच्या पायावर लागली गोळी, रुग्णलयात भरती