एक्स्प्लोर

Sanjay Shirsat: शरद पवारांनी 2022 साली एनडीएमध्ये येण्यासाठी प्रयत्न केला, खातेवाटपाबाबत चर्चाही झाल्या, पण...; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा

Sanjay Shirsat:कोणती खाती घ्यायची की नाही याबाबत चर्चा देखील झाल्या होत्या. मात्र शरद पवार यांच्याकडून काही येत नाही तो पर्यंत बोलता येत नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत, अशातच दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं तर शरद पवाप एनडीए सोबत आले गेले असते का? असा सवाल उपस्थित झाला होता, त्यानंतर आता शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एनडीमध्ये (Nda)मध्ये येण्यासाठी 2022 मध्ये सुद्धा प्रयत्न केला होता हे. नाकारता येत नाही, कोणती खाती घ्यायची की नाही याबाबत चर्चा देखील झाल्या होत्या. मात्र शरद पवार यांच्याकडून काही येत नाही तो पर्यंत बोलता येत नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

कोणती खाती नाही घ्यायची इथपर्यंत सगळ्या चर्चा घडल्या

मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार यांचे 2022 मध्ये एनडी मध्ये येण्याचे प्रयत्न सुरू होते, असे त्यांनी म्हटले आहे. कोणती खाती घ्यायची याबाबत देखील चर्चा झाली होती असा दावा संजय शिरसाठ यांनी केला आहे. एनडीएमध्ये येण्यासाठी आत्ताच नाही तर 2022 मध्ये सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला होता, हे नाकारता येत नाही, आणि त्याच्यावर देखील चर्चा झाल्या होत्या, कोणती खाती घ्यायची, आणि कोणती खाती नाही घ्यायची इथपर्यंत सगळ्या चर्चा घडल्या होत्या, हे त्या काळाचं घडलेलं गणित होतं. आत्ता या मधल्या काळामध्ये चर्चा झाल्या की नाही, झालेल्या चर्चा कशाच्या आधारावर झाल्या, याबाबत आणखी जोपर्यंत स्पष्टीकरण शरद पवार देत नाहीत, तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणे मला उचित वाटत नाही, असेही पुढे संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.(Sanjay Shirsat)

शरद पवारांना त्यावेळी एनडीए मध्ये जायचं असतं तर....

संजय शिरसाठ यांच्या या दाव्यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, संजय शिरसाट यांना 2022 ची आठवण 2026 मध्ये कशी आली, हे मला कळत नाही. ते कसं आहे त्यांची सगळ्यांची स्क्रिप्ट ठरलेली आहे, एखाद्या पक्षाला किंवा नेत्याला बोलायचं ही स्क्रिप्ट ठरलेली आहे. त्यांना त्यावेळी माहिती होतं तर त्यावेळी का नाही ते बोलले, जर शरद पवारांना त्यावेळी एनडीए मध्ये जायचं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झालं नसतं, इतकं साधं त्यांना कळत नाही का? त्यांना मंत्री कुठले करणार, काय कोण बनणार, हे त्यांना अगोदर कळलं ही सगळी भंपकगिरी आणि बोगसगिरी आहे. मुद्दाम एखाद्या नेतृत्वाबद्दल बोलायचं आणि स्वतः चर्चेत राहिले पाहिजे अशी भूमिका ते करतात, त्यांना महत्त्व देणे गरजेचे वाटत नाही, असंही शशिकांत शिंदेंनी म्हटलं आहे. 

या चर्चेमागचा हेतू काय आहे हे त्यांनाच विचारा

काही दिवसांपासून ज्या पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, या चर्चा सुरू असताना मलाही कळत नाही का? संजय शिरसाट आणि त्यांच्या पक्षाचे लोक अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भात संशय व्यक्त करतात आणि त्याचबरोबर हे शिरसाट रोज स्टेटमेंट वेगवेगळे देत आहेत आणि संभ्रम निर्माण करत आहेत, त्यांच्या या चर्चेमागचा हेतू काय आहे हे त्यांनाच विचारा, पण अशी कोणती कसलीही चर्चा आधी झालेली नाही, आम्ही शरद पवार साहेबांसोबत असतो मी आधीही सांगितलं तसं अजित पवारांचा जो पक्ष विभागला गेला तो या मुद्द्यावरच विभागला गेला होता, तसा झाले नसताना मग, 2022 ला माहिती घडलेलं ते आता 2026 मध्ये सांगत असतील तर ती स्क्रिप्ट आहे असं मला वाटतं आणि जाणीवपूर्वक ही स्क्रिप्ट वाजवली जात आहे, वेगवेगळ्या तोंडातून असं मला वाटत आहे,  असंही शिंदे पुढे म्हणालेत.

याबाबत मला काहीच माहित नाही त्यांनाच विचारा त्यांना कुठून कशी माहिती मिळाली कोणती खाते मिळणार होती ते त्यांनाच विचारा मला माहिती नाही त्या गोष्टीवरून मी कसं सांगणार, एकीकडे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा आहे अशातच संजय शिरसाट यांनी हा गौप्यस्फोट चर्चेत आला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
Embed widget