Sharad Pawar: निष्ठावंत कार्यकर्ते हे आपल्या पक्षाचा मौल्यवान ठेवा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीची चिंता करु नका. तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंध राहिले आणि आपला विचार पुढे नेला तर सत्ता आपोआप येईल. ती येण्याची स्थिती मला महाराष्ट्रात दिसत आहे. उद्या निवडणुका होतील तेव्हा हे चित्र बघायला मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ते मंगळवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात (NCP Vardhapan Din) बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भविष्यात आपली सत्ता येण्याची चिन्हे आहेत, असा आशावाद दिला. यावेळी शरद पवार यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील लंके यांचा उल्लेख केला.
तुम्ही अहमदनगरच्या खासदारांचं भाषण ऐकले असेल. तुम्ही कोणी कधी त्यांच्या घरी गेलायत का, असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला. त्यावर कार्यकर्त्यांपैकी एकाने, ते (निलेश लंके) कधी आम्हाला घरी बोलवत नाहीत, अशी मिश्कील टिप्पणी केली. तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर शरद पवार यांनी म्हटले की, ते तुम्हाला घरी बोलवत नसतील तर आता ते तुमच्या घरी येतील. त्यांचं घर अक्षरश: एका खोलीचे आहे. या घरात ते रात्री दोन-तीन वाजेपर्यंत लोकांना भेटत असतात. लोकांचं काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. निलेश लंके यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे आपल्या पक्षाचा मौल्यवान ठेवा आहेत. तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंध राहून विचाराने पुढे येतील तेव्हा सत्ता आपोआप येईल. पक्षातील फुटीची चिंता तुम्ही करु नका. कोण आले कोण गेले, याची चिंता करु नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेविषयी बांधिलकी कायम ठेवली तर काहीही अडचण येणार नाही. सत्ता येण्याची स्थिती मला महाराष्ट्रात दिसत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
NCP Vardhapan Din 2025: शरद पवार नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादीला जनतेचा पाठिंबा मिळाला२६ वर्षांपूर्वी आपण एकत्र येवून पक्ष स्थापन केला२६ वर्ष लोकांनी सेवेची संधी दिलीअनेकांना पक्षाने संधी दिलीकार्यकर्त्यांमुळे आज हा दिवस साजरा करण्याची संधी
आर.आर. पाटलांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून कष्ट केले..आबा सामान्य कुटुंबातील होतेसामान्य माणसाला संधी मिळाली की तो कर्तृत्व दाखवू शकतोमहाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी काम करत राहिलेपक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे पुढे आला
जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचं काम केलंपक्षाला मिळालेली प्रतिष्ठा कार्यकर्त्यांच्या कामामुळेचआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांनी संधी देणारसंधी दिली तर महिला कर्तृत्व दाखवतात५० टक्के महिलांना निवडून द्या२-३ महिन्यात स्था.स्व. संस्थांच्या निवडणुका लागतीलऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यातील महिलांनी केलेल्या कामगिरीचा देशाला अभिमानराष्ट्रहितात मी कधीच राजकारण आणत नाहीदेशहितासाठी नेहमीच ठाम भूमिका घेतली
Jayant Patil: जयंत पाटलांविषयी शरद पवार काय म्हणाले?
जयंत पाटलांनी १० वर्ष अर्थमंत्री म्हणून काम पाहिलंविरोधी बाकावरही आपण प्रामाणिकपणे काम केलंसत्ता येते जाते...पुन्हा सत्तेता येणार हा विश्वास
जयंत पाटलांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणे केलंजयंत पाटील म्हणाले नवीन चेहऱ्यांना संधी द्याजयंत पाटलांच्या मागणीवर निर्णय प्रमुख सहकाऱ्यांशी बोलून घेणारप्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात नवी फळी तयार करू
आणखी वाचा
