Sharad Pawar On Chhagan Bhujbal: राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी, छगन भुजबळांना डावलले; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sharad Pawar On Chhagan Bhujbal: राज्यसभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

Sharad Pawar On Chhagan Bhujbal: राज्यसभेच्या 26 जागांसाठी (Rajya Sabha Election 2026) उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Politics) सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. राज्यसभेसाठी राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज सकाळी 11.30 वाजता राजेंद्र जैन यांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसेच भाजपकडून आशिष शेलार आणि शिवसेनेकडून भरत गोगावले यांनीही हजेरी लावली.
राज्यसभेसाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात आली. अमरसिंह पंडित हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र अखेर राजेंद्र जैन यांची राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरुन बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपल्याला राज्यसभेची उमेदवारी आणि पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल अप्रत्यक्ष आणि सूचकपणे का होईना नाराजी व्यक्त केली. तुमच्यावर अन्याय झाला आहे का, असा प्रश्न विचारल्यावर, 'अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नही तो कल , कल नही तो परसो, असे आमचे धोरण आहे. 'मैं कबड्डी का खिलाडी हूँ, शतरंज का खिलाडी नहीं हूँ', अशी सूचक टिप्पणी केली. दरम्यान, राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीवर आणि छगन भुजबळांच्या नाराजीवर शरद पवारांना विचारले असता, छगन भुजबळांना डावलेले आहे की नाही. मला माहिती नाही. माझी कोणाशी चर्चा नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
छगन भुजबळांच्या नाराजीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? (Chhagan Bhujbal On Supriya Sule)
दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू? पण छगन भुजबळ यांच्याबद्दल माझ्या मनात आदर, प्रेम राहिलं आहे. त्यांनी शून्यातून खूप मोठं विश्व उभं केलं. त्यांनी आदरणीय पवार साहेबांसोबत ते अनेक वर्षे ते सुख-दु:खात राहिलेले आहे, याची जाणीव मला आहे. मी त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहीन. ते दुखावले असतील मला याची माहिती नाही. पण ते आयुष्याच्या ज्या टप्प्यावर भुजबळ उभे आहेत, त्यांनी जो त्याग केलाय, कष्ट केलेत, त्यानंतर त्यांना दिल्लीला यायचं असेल त्यामध्ये गैर काय? आम्ही एकत्र असतानाही शरद पवारांचा फार आग्रह होता, भुजबळांचं नेृतृत्व फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व मिळालं पाहिजे, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. भारताला एक मोठा नेता मिळू शकला असता, पार्लामेंटमध्ये त्यांची उत्तम भाषण करण्याची पद्धत, त्यांचे विचार....ते दिल्लीत आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं. पण शेवटी तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. पण भुजबळ दिल्लीला आले असते तर मला मनापासून आनंद झाला असता. त्यांच्या भाषणांमधून आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळाले असते, एवढाच माझा स्वार्थ होता, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
कोण आहेत राजेंद्र जैन? (Who Is Rajendra Jain)
राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील एक प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत असतानाच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सक्रिय वावर आणि प्रभाव वाढत गेला. विधान परिषद सदस्य (माजी आमदार): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या पक्षकार्याची दखल घेत त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर पाठवले होते. 2016 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परिणय फुके यांच्याकडून पराभव झाला होता.
राज्यसभेच्या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)
- नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख (Last Date for Nomination): 8 जून 2026
- नामांकनांची छाननी (Scrutiny of Nominations): 9 जून 2026
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Last Date for Withdrawal): 11 जून 2026
- मतदानाची तारीख (Date of Poll): 18 जून 2026 (सकाळी 9 ते दुपारी 4)
- मतमोजणी व निकाल (Counting of Votes): 18 जून 2026 (सायंकाळी 5 वाजेपासून)
शरद पवार काय काय म्हणाले?, VIDEO:
संबंधित बातमी:
Before You Go
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला






















