Sharad Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. 28) विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन (Ajit Pawar Death Plane Crash) झाले आहे. गुरुवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आज शुक्रवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये ज्या ठिकाणी अजित पवारांना अग्नी दिला गेला, तिथे राख सावडण्याचा विधी पार पडला. आता अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. आता यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. अजित पवारांच्या निधनाबाबत विचारले असता ते म्हणाले की, अजित पवार गेली अनेक वर्ष संघटनेचे काम करत होते. अजित सामान्यांशी सुसंवाद ठेवून काम करणारा कर्तृत्ववान नेता होता. अजित पवारांना लोकांच्या प्रश्नांची सखोल माहिती होती. अजित पवारांच्या दैनंदिन कामाची सुरुवात पहाटेच व्हायची ते आज हयात असते तर घरी दिसले नसते, ते आता फिल्डवर असते. लोकांना न्याय दिनाचे काम अजित पवार करत होते, असे त्यांनी म्हटले.
Sharad Pawar on Sunetra Pawar Oath: शरद पवारांच्या 'मला माहितीच नाही' वक्यव्याची चर्चा रंगली
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार याबाबत माहिती नाही, असे त्यांनी म्हटले. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या लोकांनी निर्णय घेतला असावा, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले. नरेश अरोरा आणि सुनेत्रा पवार यांच्यात काल बैठक झाली. याबाबत विचारले असता नरेश अरोरा कोण हे मला माहीत नाही, असे शरद पवारांनी म्हटले.
Sharad Pawar on NCP Merger: विलिनीकरणाच्या चर्चेत आता खंड पडलेला दिसतोय
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार अशी चर्चा रंगली आहे. याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात याबाबत गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या. त्याचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होते. मात्र विलिनीकरणाच्या चर्चेत आता खंड पडलेला दिसत आहे. आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं. हा निर्णय 12 तारखेला जाहीर करायचं ही तारीख अजित दादा यांनी दिली होती. दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा होती. पण, अचानक ही घटना झाली. दादांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण व्हावी अशी सुद्धा आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा
