एक्स्प्लोर

Sharad Pawar on LPG gas price Hike: एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ, शरद पवारांनी मोदींच्या वक्तव्याचा 'छुपा' अर्थ सांगितला, म्हणाले, 'टप्याटप्याने धक्का बसणार'

Sharad Pawar on LPG gas price Hike: देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर आधीच गगनाला भिडलेले असताना, केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक मोठा झटका दिला आहे.

Sharad Pawar on LPG gas price Hike: देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर आधीच गगनाला भिडलेले असताना, केंद्र सरकारने (Central Government) रविवारी सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक मोठा झटका दिला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG gas price Hike) दरात थेट 29 रुपयांची वाढ केली आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या घरातील किचनचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलिंडरवर करण्यात आली असून, गेल्या तीन महिन्यांत घरगुती गॅसच्या किमतीत झालेली ही दुसरी मोठी वाढ आहे. केंद्राच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या धोरणांवर कडाडून टीका केली आहे.

Sharad Pawar on LPG gas price Hike: नेमकं काय म्हणाले शरद पवार? 

या दरवाढीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, "सातत्यानं हे दर वाढवतायेत, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर होतोय. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, असं सांगितलं. पण, नियंत्रित याचा अर्थ टप्प्या टप्प्यानं हा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र आहे, त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल," असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. 

LPG gas price Hike: दिल्ली आणि मुंबईतील नवीन दर काय?

दरम्यान, या नव्या दरवाढीनंतर आता राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 913 रुपयांवरून थेट 942 रुपयांवर पोहोचली आहे. तर देशातील इतर भागांप्रमाणेच मुंबईतही 29 रुपयांचीच वाढ झाली असून, मुंबईतील दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. यापूर्वी 7 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) व दैनंदिन वापरातील अन्य वस्तूंच्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक अगोदरच मेटाकुटीला आला असताना, आता गॅस सिलेंडरच्या दरांनी गरिबांचे कंबरडे मोडले आहे.

LPG gas price Hike: आणखी दरवाढीची भीती; कंपन्यांना अजूनही तोटा

एलपीजी गॅसचे उत्पादन करणाऱ्या सरकारी तेल कंपन्या अजूनही प्रत्येक घरगुती सिलिंडरमागे 703 रुपयांचा तोटा सहन करत आहेत. त्यामुळे आगामी काळात घरगुती गॅस सिलिंडरचे भाव आणखी वाढण्याची भीती बाजार तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. काही दिवसांपूर्वीच 1 जून रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या दरात 42 रुपयांची वाढ केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या पाच महिन्यांत 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरचे दर तब्बल दुप्पट झाले आहेत.  1 जानेवारीपूर्वी 19 किलोच्या सिलिंडरचा दर 1580 रुपये होता, तो 1 जून रोजी थेट 3113.50 रुपयांवर पोहोचला आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस आणि अन्नधान्याचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यातच आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास महागाईचा हा भडका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

तेल कंपन्यांना मोठा फटका, दररोज 600 कोटी रुपयांचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Amol Kolhe on CJP Laathicharge: 'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
Sachin Sawant : विद्यार्थ्यांवर अमानुषपणे हल्ला, पोलिसांनी इलेक्ट्रिक शॉक दिले, विद्यार्थिनींचे कपडे फाडले, मोदींनी माफी मागावी : सचिन सावंत
विद्यार्थ्यांवर अमानुषपणे हल्ला, पोलिसांनी इलेक्ट्रिक शॉक दिले, विद्यार्थिनींचे कपडे फाडले, मोदींनी माफी मागावी : सचिन सावंत
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
Embed widget