Ulhasnagar Politics : उल्हासनगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येतेय. कलानी कुटुंबाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं (Sharad Pawar NCP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. पप्पू कलानी यांची सून माजी महापौर पंचम कलानी (Pancham Kalani) यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांच्या जागी काँग्रेसमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात आलेल्या सीमा आहुजा (Seema Ahuja) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टीम ओमी कलानी यांनी शिवसेना आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिलेल्या समर्थनामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली होती. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याची चर्चा उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर उल्हासनगर हे पवारांच्या विचारांचे शहर आहे' असं म्हणत प्रवक्ते महेश तपासे यांनी या बदलावर शिक्कामोर्तब केलाय.
Ulhasnagar Politics : पक्षाशी बांधीलकी न जपल्याचा ठपका ठेवत पंचम कलानी यांच्यावर कारवाई?
उल्हासनगरचे राजकारण आणि कलानी कुटुंब हे समीकरण गेल्या अनेक दशकांपासून कायम आहे. मात्र, आता याच गडाला राष्ट्रवादी शरद पवार गटानं सुरुंग लावला आहे. पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी यांची पक्षांतर्गत कारवाई करत जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत ओमी कलानी आणि त्यांच्या टीमने महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलानी गटाची शिवसेनेशी वाढलेली ही जवळीक शरद पवार गटाला रुचलेली नाही. पक्षाशी बांधीलकी न जपल्याचा ठपका ठेवत पंचम कलानी यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगितले जात आहे.
Mahesh Tapase NCP : आता नव्या दमाने निवडणुका लढवू आणि जिंकू" : महेश तपासे
तर या नियुक्तीबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी स्पष्ट केलं की, उल्हासनगरमधील कार्यकर्त्यांना नवीन नेतृत्वाची ओढ होती. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा आहुजा यांची निवड करण्यात आली आहे. जुन्या जिल्हाध्यक्षांना का काढलं यावर थेट भाष्य टाळलं असलं तरी, "आता नव्या दमाने निवडणुका लढवू आणि जिंकू" असं म्हणत त्यांनी बदलाचे संकेत दिले आहेत. तर सध्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या सीमा अहुजा हे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्या सासूबाई देखील राष्ट्रवादीच्या नगरसेविका होत्या. पदभार स्वीकारताच सीमा आहुजा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जुनी कार्यकारणी काम करत होती की नाही हा त्यांचा प्रश्न मात्र मला नव्याने जी पद भेटलेला आहे त्याचे मी त्या पदाचा पूर्ण काम करणार मी वरिष्ठांनी जो निर्णय घेतला तो योग्य घेतलेला आहे मला जे अध्यक्ष चे पद मिळालेला आहे त्या पदामुळे मी उल्हासनगर शहराचा विकास करू शकेल लवकरच आता नवीन नियुक्त करणार ज्यांनी काम केलेला आहे त्यांचं काम समोर ठेवूनच पुढचा निर्णय घेतला गेला असे सांगत उल्हासनगरमधील वाढत्या नशखोरी विरोधात पोलिसांच्या मदतीने राष्ट्रवादी शरद पवार गट मोठी मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले .
दरम्यान, पप्पू कलानी सलग 4 वेळा आमदार राहिले आहेत, तर ज्योती कलानी यांनीही शहराचं प्रतिनिधित्व केलंय. आता जेलमधून बाहेर आल्यावर पप्पू कलानींनी शहर पिंजून काढलं होतं. मात्र, महायुतीमधील अंतर्गत समीकरणं आणि आता शरद पवार गटाने केलेली ही कारवाई, यामुळे कलानी कुटुंबाला आपली राजकीय रणनीती बदलावी लागणार आहे.
अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तासंघर्षाचा क्लायमॅक्स आता जवळ आला आहे, मात्र निकालात होणाऱ्या विलंबामुळे चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक भाजपचा गट सोडून शिवसेनेत गेल्यानं भाजपला उपनगराध्यक्ष पदावर पाणी सोडावं लागलं होतं. या फुटीविरोधात भाजपनं जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. 5 मे पूर्वी या याचिकेचा निकाल येणं अपेक्षित होतं, मात्र 6 तारीख उलटूनही निकाल न आल्यानं तर्क-वितर्कांना उधाण आलंय. जिल्हाधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव आहे का? असा प्रश्न आता अंबरनाथकर विचारू लागले आहेत.
