Sharad Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासंदर्भातएकमहत्वाचीबातमीसमोरआलीआहे. पक्षाचेजेष्ठनेते शरद पवारांकडून (Sharad Pawar) पक्षात महत्त्वाचे फेरबदल करण्यातआलेआहे. पक्षाच्या युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या जागी पक्षाच्या नव्या नियुक्त्या करण्यातआल्याआहेत. विद्यार्थी अध्यक्षपदी शुशील बेर्डे यांची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यातआलीआहे. तर पक्षाच्या युवक अध्यक्षपदात विभागणी करून एक ग्रामीण आणि एक शहरी युवक अध्यक्ष नेमण्याचा पक्षांकडून निर्णय घेण्यातआलाआहे. युवकच्या शहरसाठीच्या प्रदेशाध्यक्ष पदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यातआलीआहे. तर यापूर्वी महाराष्ट्र युवती अध्यक्ष पद देताना देखील बदल करत शहर आणि ग्रामीणसाठी अध्यक्ष निवड करण्यात आली आहे. मनाली भिलारे शहरच्या युवती प्रादेशाध्यक्षा तर अमृता कालदाते ग्रामीणसाठी प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्त करण्यातआलीआहे. एकूणच जेष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवली असल्याचेबोललंजातआहे. (Sharad Pawar NCP)
NCP: पक्षाच्या युवक अध्यक्षपदात विभागणी, ग्रामीण आणि शहरी युवक अध्यक्ष नेमण्याचा पक्षांकडून निर्णय
पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने विशाल शंकर वाकडकर यांची प्रदेशाध्यक्ष (शहर), महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी छत्रपतीसंभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, छत्रपतीसंभाजीनगर ग्रामीण कार्याध्यक्ष आशिष पवार, माजी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे, शिक्षक सेल राज्य प्रमुख राम राठोड यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. अशीमाहितीपक्षाच्यावतीनेदेण्यातआलीआहे.
Rhiya Ahir : मुंबईमध्ये पोलीस व्हॅनसमोर निर्भयपणे उभा राहिलेल्या रिया अहीरने घेतलीशरद पवार यांची भेट
तरदुसरीकडे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या काळात मुंबईमध्ये पोलीस व्हॅनसमोर निर्भयपणे उभा राहिलेल्या रिया अहीर हिने शरद पवार यांची भेट घेतलीय. रियाने आंदोलनाच्या काळात दाखविलेले धैर्य देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. तिने एकटीने आंदोलनकर्त्यांना घेऊन जाणारी पोलीस व्हॅन अडवली होती. जनशक्तीच्या अविष्काराचे प्रतीक बनले हे चित्र मात्र रियासाठी प्रचंड त्रासदायक ठरले आहे. तिला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याशिवाय तिचे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ करून तिची बदनामी करण्याचे उद्योग केले जात आहेत. हे अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे. केवळ सरकारविरोधी आंदोलन केले म्हणून अशा पद्धतीने सूड उगविण्याचा हा प्रकार लोकशाहीविरोधी आहे. या कठीण काळात आम्ही सर्वजण तुझ्यासोबत खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास यावेळी रियाला दिला. माझी शासनाला विनंती आहे की, रिया अहीर हिला त्रास देणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करून तिच्या सुरक्षिततेबाबत आश्वस्त करावे. अशीमागणीयावेळीशरदपवारयांनीप्रशासनालाकेलीय.
इतर महत्वाच्या बातम्या
