बारामती :  पंतप्रधान नरेंद्र मोदींना (pm narendra modi) शरद पवारांकडून (Sharad Pawar) बारामतीत येण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  (pm narendra modi) हस्ते करण्यासाठी हे आमंत्रण देण्यात आलं आहे. विद्या प्रतिष्ठान मधील नक्षत्र गार्डनमध्ये गौतम बुद्धांचा हा पुतळ्याचे उभारण्यात येत आहे. आज शरद पवारांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. २ ऑक्टोबरला किंवा १६ ऑक्टोबरला (अद्याप तारीख निश्चित नाही) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्याचा शरद पवारांचा मानस आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप तारखेबाबत निर्णय कळवण्यात आलेला नाही. मात्र नरेंद्र मोदी येणार आहेत हे मानून बारामतीत तयारी केली जात आहे. (pm narendra modi)

शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ फुटी बुद्धांचा पुतळा नक्षत्र गार्डनमध्ये उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांसारख्या १३ महामानवांची पेंटींग्ज असणार आहेत. २ ऑक्टोबरला किंवा १६ ऑक्टोबरला (अद्याप तारीख निश्चित नाही) महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त या डोमचे अनावरण व्हावं यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. आज झालेल्या विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत नरेंद्र मोदींना बोलवण्याबाबत ठराव संमत करण्यात आला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामतीला भेट देण्याची शक्यता आहे. बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये गौतम बुद्धांचा पुतळा उभारण्यात आलाय आणि याच पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. शरद पवार यांनी या कामाची पाहणी केली आहे. २ ऑक्टोबरचे आमंत्रण मोदींना देण्यात आले आहे. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून अजून तारखेचा निर्णय कळवण्यात आलेला नाही, तरीही मोदी येणार हे गृहीत धरूनच आता तयारी सुरू आहे. दरम्यान, एकीकडे इंडिया आघाडीने भाजपच्या विरोधात रान पेटवलेले असताना, पवार मात्र सर्व बाजूंनी संबंध जपत असल्याचे या निमित्ताने समोर येत आहे.

एकीकडे विरोधी पक्षांचे राजकारण देशात आक्रमक होत असताना, दुसरीकडे ऑक्टोबर महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला बोलवण्याचा ठराव विद्या प्रतिष्ठानच्या आज झालेल्या बैठकीमध्ये संमत करण्यात आलाय. शरद पवार या विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. नरेंद्र मोदींना बोलवण्याचे निमित्त ठरणार आहे ते या विद्या प्रतिष्ठानच्या नक्षत्र गार्डनमध्ये उभारण्यात आलेला डोम. या डोममध्ये ९ फुटांचा गौतम बुद्धांचा पुतळा असणार आहे, त्याचबरोबर १३ पेंटिंग्स असणार आहेत. महामानवांची म्हणजेच महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज अशा महामानवांची १३ पेंटिंग्स असणार आहेत. आणि या सगळ्याचे अनावरण २ ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी करण्याचा शरद पवार यांचा मानस आहे. मात्र तारीख अजून नक्की नाहीये, २ ऑक्टोबर किंवा १६ ऑक्टोबर यापैकी एक तारीख ठरण्याची शक्यता आहे. शरद पवार स्वतः नरेंद्र मोदींना आमंत्रण देण्यासाठी पत्र लिहिणार आहेत आणि दिल्लीत गेल्यानंतर त्यांची स्वतः भेटदेखील घेणार आहेत, तसेच त्यांना बारामतीला येण्याचे आमंत्रण देणार आहेत. त्यामुळे अर्थातच विरोधकांचे जे राजकारण आहे, त्यातून शरद पवार स्वतःला एका अर्थाने वेगळे करताना दिसत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडी असेल किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी असेल, ती या सगळ्या गोष्टींकडे नेमक्या कोणत्या पद्धतीने बघणार आहे, हे बघणे देखील महत्त्वाचे ठरेल.

Sharad Pawar on NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं महत्त्वाचं भाष्य

गेल्या काही  दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चेचा विषय ठरत असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत (NCP Merger) आता खुद्द शरद पवार यांनीच भाष्य केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा संबंधच नाही, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले. ते मंगळवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवार यांनी हे वक्तव्य करुन राजकीय वर्तुळाला पुन्हा एका संभ्रमात टाकले आहे. काही दिवसांपूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा विरोध असल्याची कुजबुज समोर आली होती. त्यानंतर आता शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची शक्यता थेटपणे उडवून लावल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नेमकं काय सुरु आहे, याबाबतचा संभ्रम आणखीनच वाढला आहे. (Maharashtra Politics news)

काही दिवसांपूर्वीच दिल्लीत पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. दिल्लीत जंतर मंतर येथे दिल्ली पोलिसांनी 20 जुलैला आंदोलकांवर लाठीमार केला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदी यांना संसदेत भेटले होते. यावेळी शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार आणि प्रफुल पटेल  हे शरद पवार यांना भेटायला गेल्याची माहिती आहे. तसेच अलीकडेच अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अमित शाह यांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत सत्तेत सामील होणार, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, भाजप नेतृत्त्वाने शरद पवार यांनी राष्ट्रवादीत विलीन होऊनच एनडीएसोबत यावे, अशी घट घातली होती. यामुळे पार्थ पवार व प्रफुल पटेलांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला वेग आल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, शरद पवार यांनी आज बारामतीत दिलेल्या प्रतिक्रियेने या चर्चेत फारसे तथ्य नसल्याचे दिसून येत आहे.