Sharad Pawar Dinner Diplomacy : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील 7 जागांवरील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यंदा राज्यसभेवर (Rajya Sabha Election 2026) पवार घराण्यातून आजोबा आणि नातू दोघे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) हे महाविकास आघाडीकडून (MVA) तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) हे महायुतीकडून (Mahayuti) राज्यसभेवर निवडून गेले आहेत. अशातचहिनिवडझाल्यानंतरपक्षाचेसर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून माविआचेनेतेआणि आमदारांसोबत विशेषकार्यक्रमाचेआयोजनकरण्यातआलंआहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मविआ (MVA) आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी (Dinner Diplomacy) करण्यातयेणारआहे.

Continues below advertisement

मिळालेल्यामाहितीनुसार, शरद पवार यांची मविआकडून राज्यसभा खासदार म्हणून निवड केल्याच्या निमित्ताने आभार प्रकट करण्यासाठी या डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आल आहे. येत्या सोमवारी म्हणजेच, 23 मार्चया तारखेला संध्याकाळी 7 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या डिनर डिप्लोमेसीचे आयोजन करण्यात आले आहे. या डिनर डिप्लोमसीमध्येआता काही राजकीय चर्चा होणार का हे पाहण महत्वाच ठरणार आहे.

Sharad Pawar : 1967 मध्ये प्रथम महाराष्ट्रात विधानसभेवर, पुन्हा एकदा सहा वर्षे सेवा करण्याची संधी

Continues below advertisement

राज्यसभेच्या एका जागेवर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. यानंतर शरद पवार यांनी सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.  1967  पासून माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे. हा प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, कारण त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणे मला शक्य झाले.

1967  मध्ये प्रथम महाराष्ट्रात विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सातत्याने काम करत असताना लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली. तसेच केंद्रात संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारीही मला मिळाली. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ राहिले आहे. अशीप्रतिक्रियाशरदपवारांनीदिलीहोती.

 इतर महत्वाच्या बातम्या